शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार, अविनाश जाधवांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिक मनसेत

मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शहापूरमधील शेकडो शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार, अविनाश जाधवांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिक मनसेत

रायगड : राज्याच्या विविध भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे. शहापूर तालुक्यातही शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला. (Shahapur Shivsainiks enter MNS)

“लॉकडाऊन काळात जनता विविध समस्यांनी त्रस्त झाली आहे. शहापूर तालुक्यात शिवसेनेचे तालुका नेतृत्व हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कमी पडत आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यात अनेक शिवसैनिक नाराज आहेत” असा दावा अविनाश जाधव यांनी केला.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच योग्य असल्याची स्थानिकांची भावना आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेचा झेंडा हाती घेतला, असेही अविनाश जाधव यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीतील सेना-भाजप कार्यकर्ते मनसेत

गेल्या महिन्यात कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

शिवसेना-भाजपच्या जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतल्याने कल्याण डोंबिवली मनसेत चैतन्य निर्माण झाले आहे. शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

त्याआधी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली होती. वरळीतील एनजीओ, सार्वजनिक मंडळे यांचे कार्यकर्ते आणि काही सामान्य नागरिकांनी मनसेत प्रवेश केला होता.

औरंगाबादेतील निष्ठावान शिवसैनिक मनसेत

औरंगाबाद, मुंबई, पुणे अशा विविध भागात कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पाठोपाठ खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता. (Shahapur Shivsainiks enter MNS)

संबंधित बातम्या :

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्या हाती मनसेचा झेंडा

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांचा मनसेप्रवेश

चंद्रकांत खैरे यांना धक्का, औरंगाबादेतील सात निष्ठावंत शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

(Shahapur Shivsainiks enter MNS)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *