Raj Thackeray : दगडावरचे ठसे घेण्यापेक्षा… मनसे अध्यक्षांनी ठाकरे शैलीत सुनावलं, सणसणीत टोला..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना थेट शब्दांत सुनावलं आहे. CJP च्या जंतरमंतरवरील आंदोलनातील दगड गोळा करून त्यावरील फिंगरप्रिंट आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

Raj Thackeray : दगडावरचे ठसे घेण्यापेक्षा... मनसे अध्यक्षांनी ठाकरे शैलीत सुनावलं, सणसणीत टोला..
मनसे अध्यक्षांनी ठाकरी शैलीत घेतला समाचार
| Updated on: Aug 07, 2026 | 10:37 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान त्यांनी विविध गोष्टींचा आढावा घेतला, पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. आज सकाळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.नाशिक शहर, खड्डे, कुंभमेळ्याची तयारी यापासून ते सध्या देशभरात गाजत असलेलं आंदोलन, विद्यार्थी अशा विविध बाबींवर ते बोलले. याचदरम्यान राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तर टीकास्त्र सोडलंच, पण भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. CJP च्या जंतरमंतरवरील आंदोलनातील दगड गोळा करून त्यावरील फिंगरप्रिंट आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा राज यांनी ठाकरे शैलीत समाचार घेतला. त्या आंदोलनातल्या दगडांवरचे ठसे घेऊन आधारकार्ड चेक करण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी सुनावलं.

काय म्हणाले राज ठाकरे ?

मला अनेक विद्यार्थी काल येऊन भेटले. नाशिकचा पॅटर्न राज्यभर सुरू आहे. दगडावरचे ठसे घेऊन त्यांचं आधारकार्ड चेक करण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांनी या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. असं राज ठाकरे म्हणाले. मला ही गोष्टच समजली नाही की, 10वी पास झाल्यावर पहिल्यांदा क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा आणि क्लास सांगणार कोणत्या कॉलेजात जायचं. मुलं आठ आठ तास क्लासमध्ये बसत आहे. मग कॉलेज काय करतंय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सर्वच कोचिंग क्लास वाईट आहेत असं नाही. पण आता धंदा म्हणून जे आले, नीट पेपरही कोंचिंग क्लासवाल्यांनीच फोडले. आतापर्यंतचे पेपर कोचिंग क्लासवाल्यांनीच फोडले ना. नीलेकणींनी पहिल्यांदा क्लासवर लक्ष दिलं पाहिजे. क्लास ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलसेजला जायचं? चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष दिलं पाहिजे. कॉलेजची फी 20 हजार रुपये तर क्लासची फी लाख रुपये. क्लासमध्ये अटेंडन्स लावल्यावर कॉलेजला अटेन्डन्स.. कसा लागतो. ही अशी भिक्कार शिक्षण पद्धती आहे. कॉलेजवाल्याला पैसे मिळाले असणार, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी हल्ला चढवला.

Raj Thackeray : दगडावरचे ठसे घेण्यापेक्षा… मनसे अध्यक्षांनी ठाकरे शैलीत सुनावलं, सणसणीत टोला..

Raj Thackeray : दगडावरचे ठसे घेण्यापेक्षा… मनसे अध्यक्षांनी ठाकरे शैलीत सुनावलं, सणसणीत टोला..


#MNS #RajThackeray

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us