AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता शाळा, कॉलेज,ऑफीसमध्ये घुमणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चे सूर ? अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. याचसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शासकीय अस्थापनेत राज्य गीत लावण्याचे आदेश जारी करा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

आता शाळा, कॉलेज,ऑफीसमध्ये घुमणार 'जय जय महाराष्ट्र माझा' चे सूर ? अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
| Updated on: Feb 26, 2024 | 10:45 AM
Share

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. याचसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शासकीय अस्थापनेत राज्य गीत लावण्याचे आदेश जारी करा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ‘ महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयं आणि सरकारी कार्यालयात हे आपलं ” राज्यगीत” लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा अशी विनंती ‘ असे अमित ठाकरे यांनी पत्रात लिहीले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहीलं आहे.

काय म्हटलं आहे पत्रात ?

प्रति, श्री. एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

जे गीत ऐकताच महाराष्ट्रातील मराठी जनतेचा ऊर अभिमानाने भरून येतो, ज्या गाण्याने प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात अशा “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…” ह्या कै. गीतकार राजा बढे लिखित आणि कै. शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेल्या गीताला गेल्या वर्षी दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे ‘राज्य गीत’ असा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अधिकृत शासकीय कार्यक्रमात ह्या राज्य गीताचे गायन करणे किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ते लावणे अपेक्षित आहे आणि ते गायले जावेच- लावले जावेच हा आमचा आग्रह आहे.

शासकीय परिपत्रकानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात अध्ययन वर्ग सुरू होण्यापूर्वी “जन गण मन अधिनायक जय हे…” ह्या आपल्या राष्ट्रगीताचे गायन करणे अनिवार्य आहे. राष्ट्रगीताचा मान राखण्याबाबत शालेय स्तरापासून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या राज्य गीताचे महत्व भावी पिढ्यांना- विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना आपल्या अत्यंत प्रेरणादायी राज्य गीताचा उचित सन्मान राखण्याची सवय लावण्यासाठी प्रत्येक शाळा तसंच महाविद्यालयात राज्य गीताचे गायन अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांत प्रवेश करताच विद्यार्थी सहज वाचतील अशा ठिकाणी म्हणजे शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या दर्शनी भागात एका मोठ्या फलकावर अथवा भिंतीवर ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…’ हे संपूर्ण राज्य गीत लिहून त्याला कायमस्वरुपी ठळक प्रसिद्धी देण्याचे आदेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावेत. त्याच प्रमाणे, बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागातही आपले राज्य गीत लावण्यात यावे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या या मागण्यांचा आपण गांभीर्याने विचार करावा, ही विनंती. उद्या २७ फेब्रुवारी. ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पूर्वसंध्येला आपण याबाबतचा शासकीय आदेश काढला तर सर्वांना निश्चितच आनंद होईल.

धन्यवाद.

आपला नम्र, अमित ठाकरे अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती