AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS Amit Thackeray : मनसेचा नवा पप्पू शिवसेना भवनवर गप्प का ? अमित ठाकरेंना सवाल

मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारील पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून भाजपने तीव्र निषेध करत आंदोलन पुकारले आहे. सोशल मीडियावरही अमित ठाकरेंवर टीकेची झोड उठली आहे, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलंय.

MNS Amit Thackeray : मनसेचा नवा पप्पू शिवसेना भवनवर गप्प का ? अमित ठाकरेंना सवाल
MNS Amit Thackeray
| Updated on: Sep 01, 2026 | 2:55 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते (MNS) अमित ठाकरे (Amit Thackeray) काल पुण्यात होते. मात्र तेथे ते फारच आक्रमक भूमिकेत दिसले. पुण्यातील एका कॉलेजमध्ये पोहोचलेल्या अमित ठाकरे यांनी त्या कॉलेजमधील वसतीगृह अधीक्षकांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवायला लावला. यामुळे मोठी खळबळ माजली, गदारोळ झाला. राजकीय वातावरणही चांगलंच तापलं. भाजपने यावरून अमित ठाकरेंवर निशाणा साधला, त्यांच्यावर टीकाही केली. या प्रकरणी आता अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेचा नवा पप्पू शिवसेना भवनवर गप्प का ?

दरम्यान हे प्रकरण आता आणखीनच तापलं असून अमित ठाकरे यांच्यावर सोशल मीडियावरूनही टीकास्त्र सोडण्यात येत आहे. अमित ठाकरे यांना प्रश्न विचारणारे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यातच आता एक नवा फोटो सध्या फिरत आहे. ‘शिवरायांच्या बाजूचा मोदींचा फोटो काढायला लावणारा मनसेचा नवा पप्पू शिवसेना भवनावर गप्प का? ‘ ‘ सेना भवनात महाराजांच्या वर असलेल्या बाळासाहेबांचा फोटो काढायची हिंमत दाखवणार का ?’असा प्रश्न विचारणारा एका फोटो सध्या वाऱ्याचा वेगान व्हायरल झाला असून अमित ठाकरे यांच्यावर प्रश्नांची बरसात केली जात आहे.

भाजप युवा मोर्चाचं आज दुपारी माहीममध्ये आंदोलन

आता या टीकेला मनसे आणि अमित ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान अमित ठाकरेंविरोधात भाजप युवा मोर्चा आज दुपारी माहीममध्ये आंदोलन करणार आहे. भाजप युवा मोर्चाच्या या पार्श्वभूमीवर शिवतीर्थबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते, काल त्यांनी शहरातील विविध महाविद्यालयांना भेटी देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.शिवाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या भेटीदरम्यान मात्र अमित ठाकरे यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला.

विद्यार्थ्यांना कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा मुद्दा उपस्थित करत अमित ठाकरे यांनी थेट महाविद्यालयाच्या प्राचार्य कार्यालयात धडक दिली. विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केलं जात आहे, असा सवाल करत त्यांनी प्राचार्यांकडे जाब विचारला. याशिवाय, विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने कॅम्पसमध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, विद्यार्थी प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच एका तरुणाने अमित ठाकरे यांचे कार्यालयातील भिंतीकडे लक्ष वेधलं. या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता.   हे लक्षात येताच अमित ठाकरे यांनी तो हटवण्यास सांगितलं. या घटनेनंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्याच्या मुद्द्यावरून भाजपने अमित ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला . या प्रकरणी अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपकडून करण्यात आली.

Follow Us
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!