Sharmila Thackeray : निकालानंतर शर्मिला ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सुनावलं, अरे तुमचे…

"अजित पवारांना बोलतात तुमच्या फायली बंद केलेल्या नाहीत, त्यांनाच सत्तेत घेऊन बसता. लोकांनी डोळे उघडले पाहिजेत" असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Sharmila Thackeray : निकालानंतर शर्मिला ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सुनावलं, अरे तुमचे...
Sharmila Thackeray-Eknath Shinde
| Updated on: Jan 17, 2026 | 1:04 PM

“आमचे पदाधिकारी, शाखाध्यक्ष जे दिसतील त्यांना पैसे देऊन उचलत होते. पण तरीही कल्याण-डोंबिवलीत आमचे पाच नगरसेवक निवडून आले. पैसे ओतले, माणसं चोरली, तरी आम्ही नवी मुंबईतही खातं उघडलं. याचा मला अभिमान आहे. आमची घोडदौड अशीच सुरु राहिलं” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. नवी मुंबईत सत्ताधारी महायुतीमधील दोन मंत्र्यांनी परस्परांवर आरोप केले, त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ‘त्याला अर्थ नाही. ते आपलीच प्रतिमा खराब करुन घेतायत’ “अजित पवारांना बोलतात तुमच्या फायली बंद केलेल्या नाहीत, त्यांनाच सत्तेत घेऊन बसता. लोकांनी डोळे उघडले पाहिजेत” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

“जे लोक सत्ताधीश आहेत, ते निवडणुकीत एकमेकांवर काय बोलत होते? जो पर्यंत मी सत्ता उपभोगतोय तो पर्यंत मी पुरावे देणार नाही”  शिवसेनेच्या दोन गटांमुळे मराठी मतं विभागली आहेत का? तुम्हाला काय वाटतं? “मला उद्धव, राज, रश्मी सर्वांचं खास करुन अभिमान आहे आणि अभिनंदन करीन. आमचे शून्य सगळे नगरसेवक नेले, उद्धवचे 84 पैकी 60-65 नेले होते.त्याच्यानंतर आम्ही 6 वर आलो. उद्धवचे 65-66 आले. आम्ही खूप चांगली लढत दिली. सैन्याला धान्य पुरावावं लागतं तेवढच आम्ही पुरवलं. तिथे समोर तोफा, मिसाइल सगळं असून सुद्धा चांगली लढत दिली” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Live

Municipal Election 2026

02:12 PM

Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा...

01:04 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..

01:45 PM

प्रखर विरोधक म्हणून काम करणार - अंकित सुनील प्रभू

12:39 PM

Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना

ठाण्यात एकही नगरसेवक निवडून आला नाही. अविनाश जाधव सतत आंदोलनं करत असतात. त्यावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. “ठाण्यात उपमुख्यमंत्री असल्याने आमच्या दोन-तीन उमेदवारांचे फॉर्म रद्द केले. उमदेवार, शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष पळवले. कल्याण-डोंबिवलीत हेच केलं. अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना, तुम्ही तुमची माणसं निर्माण का करत नाही? आमचे जे नगरसेवक आले, उद्यापासून आम्ही पुन्हा पक्ष बांधणी सुरु करणार. आमच्याकडे पुढची फळी तयार आहे. आम्ही लढणार” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

आम्हाला पैसे वाटूत मतदान नकोय

काही मोजक्या मतांनी सीट गेल्या? यावरही त्या बोलल्या. “आम्ही त्यांच्या पैशाला पुरे पडू शकत नव्हतो. पाच-पाच, दहा-दहा हजार मतदानाला दिले. आम्हाला पैसे वाटूत मतदान नकोय. आम्हाला काम करायचय” असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.