
मुंबईत आज ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार असून यासाठी जंगी तयारी सुरू असल्याचे बघायला मिळतंय. राज्यातील विरोधी पक्षांकडून हा मोर्चा काढला जातोय. सर्वत्र बॅनर आणि पोस्टर्स आणि सर्वपक्षीय झेंडे लावून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आलीये. राज्यातील जवळपास सर्व मोठे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे देखील या मोर्चात दिसणार आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे हे लोकलने मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेससह सर्व डावे पक्ष यात सहभागी होत आहेत. खोट्या मतदारांविरुद्ध खरे मतदार जागे व्हा! असे नारे दिले जात आहेत. बोगस मतदार यादी, मतदान यादीतील फेरफार आणि निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरुद्ध विरोधकांनी एकत्र येत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी एक वाजता हा मोर्चा होणार आहे. या मोर्चाकडे राज्याच्या नजरा आहेत.
पुण्याच्या कोंढव्यात गँगवारमधून गणेश काळेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील 4 जणांकडून गोळीबार करण्यात आला. गणेश काळेवर 6-7 गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वारही करण्यात आले. गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ आहे. समीर काळे आंदेकर हत्या प्रकरणी जेलमध्ये आहे.
आता रबी हंगामातही पीएम किसान विमा योजना मिळणार आहे. गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमूगसाठी विमा मिळणार आहे. 15 डिसेंबरपर्यंत विमा भरण्यास मुदत असणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाचं बिगुल वाजण्यापूर्वीच राज्याच्या राजकीय पटलावर घडामोडी सुरु झाल्या आहेत. रायगडमध्येही या दृष्टीने फासे टाकले जात आहेत. आता राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना एकत्र लढणार असल्याची शक्यता आहे. सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांची बैठक पार पडली असून असा तर्क लावला जात आहे. बैठकीला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार आणि महायुती सरकारवर टीका केली आहे. याचा बदला येत्या निवडणुकीत लोकं घेतील असं त्यांनी सांगितलं.
पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष समिक भट्टाचार्य म्हणाले, “बंगालमध्ये सर, सीएए आणि केंद्रीय सैन्याची गरज नाही. तृणमूल काँग्रेस येथे स्वतःहून हरेल.”
महान टेनिसपटू आणि दोन वेळा ग्रँड स्लॅम विजेता रोहन बोपण्णा यांनी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 45 वर्षीय या खेळाडूची शेवटची स्पर्धा पॅरिस मास्टर्स 2025 होती. त्याने अलेक्झांडर बुब्लिकसोबत भागीदारी केली होती. त्या स्पर्धेत, बोपण्णा आणि बुब्लिक यांना जॉन पीअर्स आणि जेम्स ट्रेसी यांनी 5-7, 6-2, 10-8 असे पराभूत केले.
पुणे येथील कोंढव्यात रिक्षा चालकाचा गोळीबार आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. गणेश काळे नावाच्या व्यक्तीचा या गोळीबारात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री गाडीखाली जॅक टाकून प्रवाशांच्या गाड्या लुटणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. जिल्ह्यात मध्यरात्री वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गावरती जाणाऱ्या वाहनांच्या खाली जॅक टाकून त्या गाड्या अडवल्या जात होत्या गाड्या.
धाराशिव जिल्ह्यात भर दिवसा टपरी चालकाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे भर दिवसा ही घटना घडली घटना असून हत्या करतानाची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ग्रामीण भाजपातर्फे बैठकांचे सत्र सुरू आहे. भाजपाकडून नाशिकच्या सटाणा येथे नगरपालिका निवडणुकी निमित्ताने इच्छुक उमेदवारांची बैठक सुरु आहे. जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांच्यासह जिल्हा कार्यकारणी यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले की, ‘आमचे पक्ष वेगळे आहेत. विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेद असतात. पण देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावे लागेल. व्यासपीठावरील नेत्यांच्या वतीने आम्ही हा निकाल घेतला. मतचोरी थांबवू आणि लोकशाही कशी टिकेल याची खबरदारी घेऊ.’
निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात बोलताना शरद पवारांनी म्हटले की, देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिनी. आजचा मोर्चा मला जुन्या गोष्टी आठवण करून देतो. मला आठवतंय १९७८-८९ या काळात महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता. काळा घोडा आणि त्याचा परिसर तिथे मोर्चे एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते. तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. त्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण होते. आज महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वतसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतोय की लोकशाहीत संविधानाने तुम्हा आम्हाला अधिकार दिला त्याची जतन करणं याची वेळ आली आहे.
सत्याच्या मोर्चात बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर राज्यातील राजकीय पक्षांची एकजूट पहिल्यांदा झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही. तर लोकशाहीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची एकजूट आहे. मतचोरी करणाऱ्यांना सांगतो आज ठिणगी बघत आहात. या ठिणगीची आग कधी होईल सांगता येत नाही. तुमच्या बुडाला लागेल. शोलेत एक डायलॉग आहे. दूर गाव में बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आयेगा. तसं सांगतो, सावध राहा. नाही तर अॅनाकोंडा येईल. राजने डोंगरच उभा केला. तरीही निवडणूक आयोग ऐकत नाही. निवडणूक आयोग यांचे नोकर आहे. मी अॅनाकोंडा का म्हणतोय. यांची भूक थांबत नाही. आपला पक्ष, निशाणी चोरली. वडील चोरत आहेत. ते पुरत नाही म्हणून मतदान चोरी करत आहेत. सर्व आले. पण सत्ताधारी आले नाही.
सत्याच्या मोर्चात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ‘आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. या विषयात सर्वांनीच भाष्य केलं आहे. बोललेले आहेत. तोच विषय नव्याने सांगण्यासारखा असं काहीच नाही. मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही ताकदीने मोर्चाला जमला. छोटे विषय आहे हा. मोठा विषय नाहीये. आम्ही बोलत आहोत. उद्धव ठाकरे बोलत आहेत. शरद पवार बोलत आहेत. यात दुबार मतदार आहेत. शेतकरी कामगार पक्ष बोलत आहे. कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेसचे लोक बोलत आहे. भाजपचे लोकही बोलत आहेत दुबार मतदार आहेत. शिंदेंचे लोकं बोलत आहेत. अजित पवारांचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहे.’
विरोधकांनी आज मतदार याद्यांमधील घोळ दुरूस्त करण्यासाठी मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहुल गांधी यांनी मतचोरी होत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने थातूरमातूर उत्तर दिलं. आयोगाचं उत्तर इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी केली नाही. खुलासा केला नाही. महाराष्ट्रातील निवडणुकाही अशाच बोगस मतदार यादीतून झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली, ती स्थानिक स्वराज्य संस्थेला वापरू नका, असं आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं. आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना सांगितलं. आम्ही सर्वजण होतो. लोकशाही मानणारे सर्वच आले पाहिजे, असा आमचा आग्रह होता. आम्ही गेलो. उत्तर मिळालं नाही. अनेक उदाहरणं दिले. नगर पालिकेसाठी मतदार याद्या जाहीर केल्या. विधानसभेच्या मतदार यादीत घोळ आहे. बोगस लोकांची नोंद आहे. ते तसेच ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे. मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे, अशी आपली मागणी आहे. सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात निवडणूक आयोग सामील झाला की काय असं वाटतं.
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाचे आता सभेत रुपांतर झाले आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच इर बडे नेते उपस्थित आहेत. या सभेत बाळासाहेब थोरात यांचे भाषण चालू झाले आहे. ते निवडणूक आयोगावर टीका करत आहेत.
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चात आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार तसेच शरद पवार सहभागी झाले आहेत. या मोर्चात चले जाव भाजपा अशी घोषणा असणारे फलक दिसत आहेत. सोबतच या मोर्चात भाजापा, मतचोरीविरोधात घोषणा दिल्या जात आहेत.
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हॉटेलमधून बाहेर आले आहेत. ते लवकरच मोर्चात सहभागी होणार आहेत.
मुंबईत मनसे-मविआचा ‘सत्याचा मोर्चाला’ अखेर सुरुवात झाली आहे. पण आता मनसे-मविआचा ‘सत्याचा मोर्चाला’ भाजपने मूक मोर्चाद्वारे उत्तर दिलं आहे. भाजपकडून मुंबईत मूक मोर्चा काढण्यात आला आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, ” मनसे-मविआकडून पालिकेआधी फेक नरेटिव्ह निर्माण केलं जात आहे.”
मुंबईत मनसे-मविआचा ‘सत्याचा मोर्चाला’ अखेर सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी ठाकरे बंधू मोर्चासाठी चर्चगेटमधील वेस्ट एन्ड हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. ठाकरे बंधू मोर्चासाठी याच हॉटेलमधून एकत्र निघणारा आहेत.
सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे लोकलने प्रवास करताना दिसत आहेत. प्रवासात त्यांच्याबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे देखील आहेत.
मुंबईत आज ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. राज्यातील विरोधी पक्षांकडून हा मोर्चा काढला जातोय. राज्यातील जवळपास सर्व मोठे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे देखील या मोर्चात दिसणार आहेत. त्यासाठीच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चासाठी मातोश्रीहून रवाना झाले आहेत.
मुंबई महानगरपालिका मुख्य इमारती समोर पुण्यातून जागरण गोंधळ घालणारे दाखल झाले आहेत. संबळ वाजवून जागरण गोंधळाला सुरवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या शिवसेना आणि मनसेचे सरकार येऊ द्या यासाठी तुळजाभवानीकडे गोंधळी करणार प्रार्थना.
विरोधकांच्या मोर्चासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. ७० ते ८० अधिकारी आणि ४०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या ४ ते ५ तुकड्याही बंदोबस्तला तैनात करण्यात आल्या आहेत. वळपास ५०० पोलीस कर्मचारी आजच्या मोर्च्याच्या अनुषंगाने सीएमटी परिसरात आणि फॅशन स्ट्रीट परिसरात तैनात आहेत.
कांदिवली येथील मनसे कार्यकर्ते निवडणूक आयोगाचा बँड वाजवत लोकल ट्रेनमधून निघाले. दिनेश साळवी म्हणाले की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा बँड वाजवला आहे, म्हणून आम्ही बँड वाजवून मोर्चाला जात आहोत.
रेल्वेचा प्रवास करत मनसे कार्यकर्ते या मोर्चा सहभागीस होण्यासाठी आले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत निषेध देखील व्यक्त केला जात आहे
माविआ आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चासाठी वसई विरार येथून शेकडो कार्यकर्ते मुंबईसाठी लोकलने रवाना झाले आहेत. मत चोरी करून सत्तेत आलेल्या सरकारला बाहेर काढा, संविधान, लोकशाही वाचवा ह्या घोषणा देत मनसे कार्यकर्ते मोर्चासाठी निघाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणांनी लोकल ट्रेनही दुमदुमला आहेत
संगमनेरवरून उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते हा प्रवास करून मुंबई दाखल झाला आहे. मुस्लीम मावळा अशी साखळी गळ्यात घालत मोर्चा सहभागी होण्यासाठी हा कार्यकर्ता दाखल झाला आहे. यावेळी मत चोरी करून महायुती सत्तेत आल्याचा आरोप या कार्यकर्त्याने केला. निवडणूक आयोगावर त्याने आगपाखड केली आहे.
मतदार याद्यांतील घोळाविरोधात सत्याचा मोर्चाची दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे. या मोर्चासाठी राज ठाकरे हे अगोदरच दाखल झाले आहेत. त्यांनी लोकलने प्रवास केला. तर आता इतर नेतेही लवकरच दाखल होतील. शरद पवार हे दुपारी 12 वाजता या मोर्चासाठी निघतील. तर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून निघतील.
मुंबई महानगरपालिका मुख्य इमारती समोर पुण्यातून जागरण गोंधळ घालणारे दाखल झाले. संबळ वाजवून जागरण गोंधळाला सुरुवात झाली आहे .राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या शिवसेना आणि मनसेचे सरकार येऊ द्या यासाठी तुळजाभवानीकडे गोंधळी प्रार्थना करणार आहे.
मुंबईत चार नवीन ठिकाणी फक्त सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतरांना ‘नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांना जबाबदारी स्वीकारुन कबुतरखाना व्यवस्थापन करावे लागणार आहे.तज्ज्ञ समिती अहवाल व न्यायालयाचे आदेश प्राप्त होईपर्यंत अंतरिम व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यमान कबुतरखाने सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. ते बंदच राहणार आहेत. मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत.
निवडणुतील पराभव लपवण्यासाठी आजचा मोर्चा काढल्या जात असल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मविआच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसमधील नेत्यांची चार दिशेने तोंड असल्याचे ते म्हणाले.
चारकोप विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी आणि कार्यकर्ते कांदिवली रेल्वे स्थानकावरून निवडणूक आयोगाचा बँड वाजवत रेल्वेने मोर्चाला पोहोचणार आहेत. दिनेश साळवी यांनी बँडच्या ढोलकीवर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेचे पोस्टर चिकटवले आहेत.निवडणूक आयोगाविरुद्ध बनवलेले पोस्टर घालून मनसेचे कार्यकर्ते बँड घेऊन मोर्चात सामील झाले आहेत. या मोर्चात पुरुष आणि महिलांसोबत मुस्लिम समाजातील लोकही सामील झाले आहेत.
शरद पवार हे बारा वाजता मोर्चासाठी सिल्व्हर ओक वरून होणार रवाना सूत्रांची माहिती. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आधी वाय बी चव्हाण सेंटर मध्ये जाणार. वाय बी चव्हाण मध्ये आधी नेत्यांची बैठक होणार सूत्रांची माहिती. त्यानंतर शरद पवार हे मोर्चा स्थळी होणार दाखल.
मविआ आणि मनसेचा सत्याचा मोर्चा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थहून मोर्चास्थळाकडे रवाना. राज ठाकरे लोकलने जाणार. राज ठाकरे सध्या रेल्वे स्टेशनवर आहेत.
मातोश्री कलानगर येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित बॅनर. आजच्या मोर्चासाठी मातोश्री परिसरात ठिक ठिकाणी बॅनर. संविधान वाचवा, लोकशाही जगवा बॅनर वर मजकूर. खोट्या मतदार यादी विरोधात खऱ्या मतदारांना मोर्चात सामील होण्याचे आवाहन ठाकरे बंधूंकडून करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा आज दुपारी 1 वाजता – सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग अपेक्षित… राज्यातील विविध भागातून कार्यकर्त्यांचा मुंबईकडे मोठ्या प्रमाणात ओघ… रेल्वेने येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे CSMT परिसरात तणावपूर्ण परिस्थिती..प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि होमगार्ड तैनात… स्थानक परिसरात पोलिसांचा मोठा फोर्स फाटा तैनात – प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर.. अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सतर्क…
उद्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी सहा लाखांहून अधिक भाविकांचे पंढरपूरात आगमन… टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात दुमदुमली संपूर्ण पंढरी नगरी… चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला… श्री विठ्ठल दर्शनाची रांग विठ्ठल मंदिरापासून तब्बल पाच किलोमीटरपर्यंत… दर्शनासाठी भाविकांना दहा ते बारा तासांचा कालावधी लागत असल्याची माहिती… उद्या पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार… भक्तिरसात न्हालेली पंढरी नगरी, जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात भारलेले वातावरण….
प्रशासनाचा प्राथमिक अहवाल जाहीर… 25 आणि 26 ऑक्टोबरच्या पावसाने धानपिके उध्वस्त, पंचनामे सुरू… धान्यांच्या कडपांना फुटले कोंब, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला… पावसाने धानपिकांचे मोठे नुकसान, आकडा आणखी वाढण्याची शक्यता… प्रशासन सज्ज…नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश…
निवडणूक आयोगाने तात्काळ उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा निवडणूक आयोगाचे कार्यालयात देखील फोडू…. भाजपचा बोबड्या किरीट सोमय्याने भाजपला घरचा आहेर दिलाय… एकाच घरात साडेपाचशे मतदार कसे आले? भाजपावाल्याने एवढी मतं हाळजली की काय, का त्यांनी जन्माला घातली काय एवढी मतं? हुकूमशाही घालवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी शिवसैनिक, मनसैनिक आणि शरद पवारांचे सैनिक एकत्र येऊन निवडणूक आयोगाला गाडल्याशिवाय राहणार नाही… वेळप्रसंगी आम्ही मुख्य निवडणूक आयोग देखील फोडल्याशिवाय राहणार नाही
सर्वच तालुक्यामध्ये लावली परतीच्या पावसाने हजेरी, शेती पिकांच नुकसान. मागच्या आठवडाभरापासून जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात परतीच्या पावसाने शेती पिकांचे होत आहे नुकसान. कापूस आणि मका त्याचबरोबर फळबागांचं होत आहे नुकसान,ऐन पीके घरात येण्याच्या काळातच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला,हजारो हेक्टरवर बसला फटका
मोठ्या आवाजात डी जे वर गाणी वाजवण्यास विरोध केल्याने तरुणावर लाठी-काठीने जीवघेणा हल्ला. शेजारी राहणारे ईश्वर सोनवणे आणि त्याचे वडील अशोक सोनवणे सह पाच ते सहा जणांनी केला जीवघेणा हल्ला. हल्यात गणेश घाटूळ नावाचा तरुण गंभीर जखमी …
काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या राजकीय खेळीने राष्ट्रवादी अजित दादा आणि शिंदे गटाला दे धक्का. शिंदे गटाचे 6 संचालक फोडत बाबाजानींकडून अजित दादांच्या संचालकावर बाजार समितीत अविश्वास दाखल करण्यात आला. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सभापती अनिल नखाते यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला,
महाविकास आघाडीने लोकसभेत विजय मिळवला, तेव्हा सर्व काही योग्य होतं का? पराभवाचा झाल्यावर निवडणूक आयोग, मतदार यादी आणि यंत्रणांवर शंका का? रविंद्र चव्हाण, अमित साटम, मंगल प्रभात लोढांसह भाजप आमदारांच्या नेतृत्वाखालील आंदोलन
दिवाळीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर जाहीर केलेल्या मदतीचा एकही रुपया न आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण. जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना बसला होता अतिवृष्टीचा मोठा फटका. जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या प्रतीक्षेतच
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पावसाळा सुरुवात. सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप देखील पाहायला मिळत आहे
महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा. नाशिक मनसेकडून मोर्चाची जोरदार तयारी गाड्यांवर स्पीकर आणि झेंडे लावत मनसैनिक होणार मुंबईला रवाना. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आजचा मोर्चा महत्त्वाचा