AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणसे मेलेली चालतात कबूतरे नाही, कोण जैन लोक…कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis and Raj Thackeray meet : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झालीये. यादरम्यान दोघे 50 मिनिटे एकत्र होती. सध्याच्या राजकिय वातावरणात या भेटीला अधिक महत्वप्राप्त झाले. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीचा थेट मुद्दाच सांगून टाकला आहे.

माणसे मेलेली चालतात कबूतरे नाही, कोण जैन लोक...कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray
| Updated on: Aug 21, 2025 | 12:01 PM
Share

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हे सरकारवर टीका करताना दिसत आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत आगामी काळातील निवडणूका लढवण्याचे संकेत असतानाच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. तब्बल 50 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट नेमकी कोणत्या मुद्दावर झाली, हे स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबुतरखान्याच्या वादावरही बोलताना राज ठाकरे हे दिसले आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. असे कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात. रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतरं महत्त्वाचे आहेत. तो राजकीय विषय आहे. त्यांना राजकारण करायचं होतं. पण त्यांना कळलं की रिस्पॉन्स मिळत नाही. आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा नव्हता. ते विषय भरकटवतात, असे राज ठाकरेंनी म्हटले.

कोर्टाने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर जैन समाज हा आक्रमक झाला. हेच नाही तर दादर कबुरतखाना परिसरात जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी महापालिकेने लावली ताडपत्री फाटून टाकत कबुतरांना धान्य टाकले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी बाचाबाची झाली आणि दादर परिसरात तणावाचे वातावरण झाले. त्यानंतर मराठी एकीकरण समितीही आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.

जैन मुनींना याप्रकरणात काही धक्कादायक विधाने केली. त्यावेळी मनसेकडून कबुतरखाना प्रश्नावर कोणत्याही प्रकारची भूमिका घेण्यात आली नाही. आता राज ठाकरे यांनी कबुरतखाना वादावर थेट भाष्य केले आहे. एकप्रकारे त्यांनी कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माणसांपेक्षा कबूतर महत्वाची नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था