Sharmila Thackeray | ‘Modi Governmentनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा’
प्रत्येक दिवस हा मराठी भाषा दिन आहे, असे समजून जर आपण वागलो तर मराठी (Marathi) भाषेचे संवर्धन होईल. 15 वर्षापूर्वी मनसेच्या (MNS) आंदोलनामुळे प्रत्येकाला आता फटाफट मराठी यायला लागली आहे, असे शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) म्हणाल्या.
प्रत्येक दिवस हा मराठी भाषा दिन आहे, असे समजून जर आपण वागलो तर आपली मराठी (Marathi) भाषेचे संवर्धन होईल. 15 वर्षापूर्वी मनसेच्या (MNS) आंदोलनामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाला आता फटाफट मराठी यायला लागली आहे, असे शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) म्हणाल्या. अमेझॉनला फोन करा किंवा पिझ्झा डिलिव्हरी बॉयला करा, रस्त्यावर भाजी विकणारा भैय्यासुद्धा मराठीत बोलू शकतो. आपण हिंदीत बोलायला लागलो, की मग ते हिंदी बोलतात. प्रत्येकांने मराठीत भाषेत बोलले पाहिजे, असा आग्रहही ठाकरे यांनी केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा न मिळण्यामागे कदाचित सरकारमधील इच्छाशक्तीची अडचण असेल. मात्र नेमके कारण माहीत नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान, सरकारने जे निकष दिले आहेत, त्यात आपली मराठी भाषा बसते. आमची अशी अपेक्षा आहे, की मोदी सरकारने लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..

