AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : मान्सूनचं…दिसला ग बाई दिसला…ते शोधू कुठं…किती दिवस लांबणीवर? वाचा

केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासही वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त वेळ लागताना दिसत आहे.  त्यामुळे मुंबईसह राज्यातही मान्सून उशीरा दाखल होणार आहे. आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होईल? याची अंदाजे तारीख हवामान खात्यानंही सांगितलेली आहे.

Monsoon Update : मान्सूनचं...दिसला ग बाई दिसला...ते शोधू कुठं...किती दिवस लांबणीवर? वाचा
मान्सून किती दिवस लांबणीवर? वाचाImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 04, 2022 | 7:40 PM
Share

मुंबई : यंदा मान्सून (Monsoon Update) लवकरात लवकर दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. या बातमीने बळीराजा (Farmers) आभाळाकडे डोळे लावून बसलेला. 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल या आशेवर शेतकरी होते. मात्र यंदाचा मान्सून लांवणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण तुर्तास तरी मान्सूनचा वेग मंदावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (Monsoon In Maharashtra) चिंता काहीशी वाढली आहे. तळकोकणासह मुंबईतई मान्सून दहा जूनच्या आसपास पोहोचले अशी शक्यता आधी हवामान खात्याने वर्तवली होती.  मात्र सध्या तरी तसे चित्र दिसत नाही. कारण केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासही वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त वेळ लागताना दिसत आहे.  त्यामुळे मुंबईसह राज्यातही मान्सून उशीरा दाखल होणार आहे. आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होईल? याची अंदाजे तारीख हवामान खात्यानंही सांगितलेली आहे.

के. एस होसाळीकर यांचं ट्विट

यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज

यंदा राज्यसह देशात चांगला पाऊस पडेल, साधारणता यंदा देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चांगला पाऊस पडल्यास सहाजिकच राज्यातली सर्व धरणं तुडुंब भरतली आणि त्याचा फायदा  पुढे पाणी पुरवठ्यास होणार आहे. मात्र त्यासाठी हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे चांगला पाऊस पडण्याची गरज आहे. सध्या मान्सूनपूर्व पावसाचे काही ठिकाणी आगमन झाले आहे. मात्र यामुळे उकाडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उकाड्याने सध्या देश हैराण झाला आहे. त्यामुळे मान्सून लवकरात लवकर दाखल व्हावा असे प्रत्येकालाच वाटत आहे.

शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी

यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज हवामान ख्यात्याने वर्तवला होता, त्यामुळे दुसरीकडे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली होती.  शेताच्या मशागतीची कामेही हाती घेण्यात आली होती. तसेच  बी बीयाणे आणि खतांची जुळवाजुळवही सुरू केली होती. मात्र मान्सूनलाच उशीर होत असल्याने शेतकऱ्यांना आता आणखी  काही दिवस तरी पेरणीसाठी वाट पाहवी लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पावसांच्या आशेवर बसला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकासान झालं आहे. त्यात अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ ही संकट तर शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली आहेत. त्यामुळे यंदाच्या मान्सूनकडून बळीराजाला अनेक अपेक्षा आहेत.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी