Beed: गुजरवाडीचा पूल पहिल्याच पावसात गेला वाहून, एकाचा मृत्यू ; …तर झाला असता मोठा अनर्थ

पावसात गुजरवाडी येथील पूल वाहून गेल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच या दुर्घटनेत एका वृद्धाला आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

Beed: गुजरवाडीचा पूल पहिल्याच पावसात गेला वाहून, एकाचा मृत्यू ; ...तर झाला असता मोठा अनर्थ
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 2:51 PM

बीड: बीड (BEED) जिल्ह्याला पावसाने (Rain) झोडपून काढले आहे. माजलगाव (Majalgon) तालुक्यात तर संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका बसला आहे. तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसात गुजरवाडी येथील पूल वाहून गेल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान रस्त्याचा अंदाज न आल्याने एक वृद्ध शेतकरी वाहून गेला. बाबुराव नरवडे असं वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचा मृतदेह सकाळी आढळून आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पूल दुरूस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत होती.  मात्र प्रशासनाकडून कसलीच डागडुजी करण्यात आली नाही. अखेर पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेला. या घटनेत एका वृद्ध शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. दिवसा या पुलावर मोठी रहदारी असते. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली, त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे ग्रामस्थ सांगतात.

मोठा अनर्थ टळला

बीड जिल्ह्यात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका हा माजलगाव तालुक्याला देखील बसला आहे. रात्री झालेल्या पावसामुळे गुजरवाडी येथील पूल वाहून गेला आहे. या घटनेत एका वृद्ध व्यक्तीला आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. बाबुराव नरवडे असं या मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान दिवसा या पुलावर मोठी रहदारी असते. दिवसा जर ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून या पूलाची डागडूजी करण्यात यावी अशी मागणी देखील सुरू होती असंही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

बीड जिल्हा तसा मराठवाड्यातील दुष्काळी भाग, जिल्ह्यात पावसाचे प्रमाम कमीच असते. मात्र यंदा जिल्ह्यावर वरूनराजाची कृपा पाहायला मिळत आहे.  बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. माजलगाव, गेवराई या तालुक्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसात काही छोट्या-मोठ्या दुर्घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान या पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाण्याची समस्या दूर झाली आहे.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.