Maharashtra Rain : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर NDRF आणि SDRF च्या 13 टीम सज्ज, मुंबईत 5 टीम तैनात; मुख्यमंत्री शिंदे यांचं परिस्थितीवर बारीक लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी गेल्या 24 तासांत सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी घेतला. कोकणात काही भागात पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Rain : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर NDRF आणि SDRF च्या 13 टीम सज्ज, मुंबईत 5 टीम तैनात; मुख्यमंत्री शिंदे यांचं परिस्थितीवर बारीक लक्ष
एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 9:16 PM

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी सांचलं. तसंच जोरदार पाऊस आणि रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. इतकंच नाही तर पुढचे चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण (Kokan), मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी गेल्या 24 तासांत सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी घेतला. कोकणात काही भागात पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार NDRF आणि SDRF च्या मिळून 11 टीम राज्यातील पुराची शक्यता असलेल्या जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत. तर बेस स्टेशनवर NDRF च्या 9 आणि SDRF च्या 4 अशा मिळून 13 टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राज्यात कोकण, मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अशावेळी नदीच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीकडे सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास तातडीने संबंधित यंत्रणांना आपत्तीच्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा

मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रेल्वेचे 25 स्पॉट आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी उपनगरी रेल्वे विभाग, बेस्ट, मुंबई महापालिका यांनी समन्वय साधून लोकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी. तसेच त्यांना नाश्ता पाणी याची देखील सोय करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने तत्काळ कार्यवाही करावी.

‘सामान्य नागरिकाला तत्काळ मदत करा’

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही द्वारे संपूर्ण पावसाच्या सद्यस्थिती वरती पूर्णपणे नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवा. सर्वसामान्य नागरिकांना पावसामुळे कुठे अडचणीत सापडल्यास तत्काळ मदत करा, अशा सूचनाही शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना केलीय.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.