Monsoon : आला रे आला…राज्यात 5 जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होणार, यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होणार

| Updated on: May 19, 2022 | 4:37 PM

यावेळी राज्यात समाधानकारक पाऊस पडेल अशी माहितीही होसाळीकर यांनी यावेळी दिली आहे. मराठवाड्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. पाऊस तळकोकणात 5 जूनला दाखल झाला तरी त्यानंतर दोन तीन दिवसांत तो संपूर्ण राज्याला व्यापेल, असेही सांगण्यात आले आहे.

Monsoon : आला रे आला...राज्यात 5 जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होणार, यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होणार
मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई – उष्णतेने (Heat Wave) लाहीलाही झालेल्या राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, मान्सून (Monsoon) 16 मे रोजी अंदमानात दाखल झाला असून, केरळमध्ये 27 मे रोजी नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे. तर सर्वांना उत्सुकता असलेला महाराष्ट्रातील मान्सून येत्या 5 जूनला तळकोकणात (Rain Update) दाखल होण्याची शक्यता आहे. नेहमी पाऊस 7 जूनच्या सुमारास राज्यात हजेरी लावतो. यावेळी पाऊस दोन दिवस अगोदरच राज्यात येणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळकर यांनी ही माहिती दिली आहे. ली नीना परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, यावेळी राज्यात समाधानकारक पाऊस पडेल अशी माहितीही होसाळीकर यांनी यावेळी दिली आहे. मराठवाड्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. पाऊस तळकोकणात 5 जूनला दाखल झाला तरी त्यानंतर दोन तीन दिवसांत तो संपूर्ण राज्याला व्यापेल, असेही सांगण्यात आले आहे.

येत्या दिवसात पाऊसाची स्थिती

गेल्या काही दिवसांत दक्षिण द्वीपकल्पात आधीच चांगला पाऊस झाला आहे. पश्चिम किनार्‍यावर येणाऱ्या सर्व आठवड्यात पावसाच्या हालचालीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि खाडीकिनारी देखील पावसाची वाढ होईल. सध्या मान्सूनसाठी आशादायक स्थिती दिसते, असे ट्विट हवामान विभागाचे के. एस होसाळीकर यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

होसाळीकर यांचे ट्विट

मान्सूनची सध्याची स्थिती

यंदा चांगल्या पावसाचा अंदाज

यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी हे पावसावर अवलंबून असतात. अनेक ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी फरफट करावी लागत आहे. त्यामुळे मान्सून जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर बळीराजा सुखावणार आहे.