Nanded : संजय बियाणींच्या हत्येचे तीव्र पडसाद, बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानं ठेवली बंद

संजय बियाणी (Sanjay biyani) यांच्या हत्येचे नांदेडमध्ये (Nanded) तीव्र पडसाद उमटले आहेत, बहुतांश व्यापाऱ्यानी आपली दुकाने बंद (Closed) ठेवत या हत्येचा निषेध केलाय. जीवनावश्यक वस्तू वगळता बहुतांश दुकाने आज बंदमध्ये सहभागी झाले होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Apr 06, 2022 | 4:11 PM

संजय बियाणी (Sanjay biyani) यांच्या हत्येचे नांदेडमध्ये (Nanded) तीव्र पडसाद उमटले आहेत, बहुतांश व्यापाऱ्यानी आपली दुकाने बंद (Closed) ठेवत या हत्येचा निषेध केलाय. जीवनावश्यक वस्तू वगळता बहुतांश दुकाने आज बंदमध्ये सहभागी झाले होते. नांदेडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीविरोधात व्यापाऱ्यांत तीव्र भावना असल्याचे या निमित्ताने दिसून आला. तर संजय बियाणी यांची अंत्ययात्रा संतप्त ग्रामस्थानी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर थांबवली. बियाणी यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर कोलंबी येथील ग्रामस्थ आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. बियाणी यांची अंतयात्रा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आल्यानंतर पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना अटक होत नाही तोपर्यंत अंतयात्रा पुढे नेणार नाही, असा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला होता. अखेर अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी आश्वासन दिल्यानंतर अंतयात्रा पुढे गेली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें