Sangliमध्ये विजेचा शॉक लागून मायलेकीचा जागीच मृत्यू
सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यातील जाडरबोंबलाद येथील सुवर्णा परसाप्पा हेळवार वय 50 वर्षें आणि विद्या संजय हेळवार वय 25 वर्षें या दोघी मायलेकीचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.
सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यातील जाडरबोंबलाद येथील सुवर्णा परसाप्पा हेळवार वय 50 वर्षें आणि विद्या संजय हेळवार वय 25 वर्षें या दोघी मायलेकीचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. ह्या घटनेची नोंद उमदी पोलिसांत झाली आहे. जाडरबोंबलाद येथील गावाजवळ राहणारे शेतकरी आय. एम. पाटील यांनी गावाशेजारील जमिनीला डुकराची वर्दळ होऊ नये, म्हणून शेताच्या कडेला तारेचे कुंपण केली होते. सोमवारी विद्या संजय हेळवार ही विवाहितेस यांची माहिती लक्षात न आल्याने लघुशंकेला गेली असताना शेतावरून गेलेली बायडिंगची तार खाली पडली. विद्या हिस शॉक लागला त्यानंतर तिचा आवाज ऐकून आई सूवर्णा हेळवार ह्यादेखील धावत गेल्या. काही सांगण्याच्या अगोदर दोघींना जबरदस्त शॉक (Electric shock) लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद माजी सरपंच एम. आर. अंकलगी यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

