AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : खासदार अमोल कोल्हेंनी वाजवला ढोल, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी ओढला रथ

काही दिवसांपूर्वी त्यांनी बैलगाडा शर्यतीत (Bull Cart Race) घोड्यावरून (Amol Kolhe on horse) घेतलेली एन्ट्री गाजत होती. त्यानंतर अमोल कोल्हेंचा आणखी एक व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे.

Video : खासदार अमोल कोल्हेंनी वाजवला ढोल, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी ओढला रथ
नेत्यांचा हटके अंदाजImage Credit source: tv9
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Feb 28, 2022 | 10:47 PM
Share

पुणे : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) त्यांच्या हटके स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी बैलगाडा शर्यतीत (Bull Cart Race) घोड्यावरून (Amol Kolhe on horse) घेतलेली एन्ट्री गाजत होती. त्यानंतर अमोल कोल्हेंचा आणखी एक व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओत अमोल कोल्हे फुल्ल जोशमध्ये ढोल बडवताना दिसून येत आहेत. या व्हिडिओचीही सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. शिरूर तालुक्यातील रामलिंग महाराज पालख़ी सोहळ्यात खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतः ढोल वाजवत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला,आज रामलिंग महाराज यांचा पालखी सोहळा होत असताना या सोहळ्यासाठी शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे उपस्थित होते , खेड तालुक्यातील निमगाव येथे बैलगाडा घाटात घोडीवर बसल्यानंतर आता खासदार अमोल कोल्हे यांनी पालखी सोहळ्यात ढोल वाजविल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.

अमोल कोल्हे ढोल वाजवताना

हर्षवर्धन पाटलांनी ओढला रथ

तर दुसरीकडे इंदापुरात हर्षवर्धन पाटील चर्चेत आले आहेत, कारण हर्षवर्धन पाटलांनी रथ ओढला आहे. इंदापूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. इंद्रेश्वर महादेव देवस्थानच्या यात्रेला प्रारंभ झाला असून आज पाच वाजता यात्रेनिमित्त ग्रामदैवताची आकर्षक रथातून प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील शेकडो महिला व नागरिकांनी सहभाग घेतला होता, महिलांनी कलशारोहन करत, टाळमृदंगाच्या निनादात सवाद्य ग्रामदैवताची मिरवणूक काढण्यात आली, यावेळी यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या आकर्षक रथाचा दोरखंड ओढत मिरवणुकीतील उपस्‍थित नागरिकांसोबत हर हर महादेव असा जयघोष करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील दिसून आले, यावेळी मोठ्या जोशपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली होती.

दोन्ही नेत्यांची लोकप्रियता मोठी

नेतेमंडळी ग्रामस्थांच्या उत्सवात सहभागी झाल्यावर ग्रामस्थांचा उत्साह तर वाढतोच, मात्र त्या नेत्याविषयी लोकांची आपुलकीही वाढते. अमोल कोल्हे आधी लोकप्रिय अभिनेते आणि आता लोकप्रिय नेते झाले आहे. तर हर्षवर्धन पाटील यांनीही राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी अनेक मोठी पदं भुषवली आहेत. दोन्ही नेत्यांचा राजकारणातला गोतवळा मोठा आहे. हे दोन्ही नेते लोकांच्या उत्सवात सहभागी होत. कार्यक्रमाला हातभार लावल्याने कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेला सुखावणारा हा क्षण आहे.

लेखी आश्वासनानंतर राजेंचं उपोषण मागे, कोणत्या मागण्या मान्य? वाचा अधिकृत यादी

‘छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले हा महाराष्ट्राचा अपमान’, चंद्रकांतदादांचा ठाकरे सरकारवर प्रहार

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचं दिलीप वळसे पाटील यांना पत्र, बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलावण्याची मागणी

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल