AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकरांनी निकटवर्तीयाला फसवले, आर्थिक व्यवहारातून कोट्यावधी रूपयाला फसवण्याचा आरोप

या प्रकरणाबाबत पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र खा.निंबाळकर यांच्या जवळच्या एकेकाळच्या निकटवर्तीय दिगंबर आगवणे यांनी केलेल्या तक्रारीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकरांनी निकटवर्तीयाला फसवले, आर्थिक व्यवहारातून कोट्यावधी रूपयाला फसवण्याचा आरोप
खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 7:02 AM
Share

सातारा – माढा (Madha) मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांनी 3 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फलटणमधील उद्योजक आणि त्यांचे निकटवर्तीय असलेले दिगंबर आगवणे (digambar aagawane) यांनी केला आहे. याबाबत दिगंबर आगवणे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्याकडे अर्ज करून रितसर तक्रार नोंदवलेली आहे. केलेल्या तक्रारी अर्जात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यामध्ये गेल्या दहा वर्षात अनेक आर्थिक व्यवहार झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या व्यवहारांमध्ये 3 कोटी 40 लाख रुपये खा.निंबाळकर यांच्याकडून येणे अपेक्षित असताना ते मिळालेले नाहीत त्यामुळे जर मला न्याय मिळाला नाही तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिगंबर आगवणे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर खासदारांनी देखील निकटवर्तीय माझ्या कारखान्याचे 7 कोटी रूपये देणे असल्याचे जाहीर केल्यापासून नेमकी कुणाची फसवणूक झाली आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

नेमकी फसवणूक कोणाची झाली आहे

दिगंबर आगवणे यांनी केलेल्या आरोपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खंडन करीत आगवणे म्हणजे मिस्टर नटवरलाल आहेत, अशी टीका करत उलट आगवणे हेच माझ्या कारखान्याचे 7 कोटी रुपये देणे लागत असून तसे पुरावे पोलिसांच्या कडे दिले असल्याचे खा.निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमकी कुणाची फसवणूक झाली असेल अशी अनेकांना शंका आहे. त्याचबरोबर एकमेकांवरती आरोप केल्याने पोलिसांनी तपास केल्यानंतपर या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल असं वाटतं.

राजकीय वर्तुळात खळबळ

या प्रकरणाबाबत पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र खा.निंबाळकर यांच्या जवळच्या एकेकाळच्या निकटवर्तीय दिगंबर आगवणे यांनी केलेल्या तक्रारीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेकदा पक्षातील नाराजीचा सूर उमटल्यानंतर अशी प्रकरण उजेडात येतात. त्यामुळे आता कागदपत्रे तपासल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागले असं वाटतंय. दिगंबर आगवणे यांनी 3 कोटी 40 लाख रुपये खा.निंबाळकर यांच्याकडून येणे अपेक्षित आहे असे तक्रारीत म्हणटले आहे. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिगंबर आगवणे माझ्या कारखान्याचे 7 कोटी रुपये देणे असल्याचे म्हणटल्याने मोठा पेच निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमर, अकबर, अँथनीचे सरकार पायात पाय अडकून पडेल, दानवेंचा महाविकास आघाडीला खोचक टोला

Russia Ukraine War : रशियाने कीव शहरातील TV टॉवरवर हल्ला चढवला, 5 जणांचा मृत्यू, सिग्नल यंत्रणेत बिघाड

Maharashtra News Live Update : नंदुरबारमधील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून विषबाधा

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.