SEBC उमेदवारांना भरतीत कसं सामावून घेणार? खुलासा करा, संभाजीराजेंचं थेट ऊर्जामंत्र्यांना पत्र

महावितरणाच्या भरती प्रक्रियेत एसईबीसीच्या उमेदवारांनाही सामावून घ्यावे, अशी मागणी संभाजीराजे यांची आहे (MP Sambhajiraje letter to Energy Minister Nitin Raut).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:50 PM, 20 Nov 2020

मुंबई : “ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माझ्याशी दुरध्वनीवर संपर्क साधून भरती प्रक्रियेत एसईबीसी वर्गातील उमेदवारांना सामावून घेणार असल्याचे सांगितले होते. तसेच वृत्तवाहिन्यांवर बोलतानासुद्धा माझ्या नावाचा उल्लेख करुन याबाबत बोलणे झाल्याचे सांगितले. पण या उमेदवारांना कशाप्रकारे सामावून घेणार याचा खुलासा ऊर्जामंत्र्यांनी करावा”, अशी रोखठोक भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतली आहे (MP Sambhajiraje letter to Energy Minister Nitin Raut).

महावितरणाच्या भरती प्रक्रियेत एसईबीसीच्या उमेदवारांनाही सामावून घ्यावे, अशी मागणी संभाजीराजे यांची आहे. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानुसार स्थापत्य अभियंता, विद्युत साहाय्यक आणि विद्युत साहाय्यक या पदांच्या भरतीमध्ये एसईबीसी प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत (MP Sambhajiraje letter to Energy Minister Nitin Raut).

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत अंतिम निर्णय दिल्यावर या एसईबीसीच्या जागांची भरती केली जाईल, असं महावितरणाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ऊर्जा विभागाच्या याच निर्णयावर संभाजीराजे यांनी नितीन राऊत यांना पत्र पाठवत याबाबत खुलासा मागितला आहे.

“महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांपैकी मराठा आरक्षण प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना वगळून नियुक्ती देण्यात येणार असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये एसईबीसी वर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे प्रथमदर्शनी वाटत असल्याने उमेदवारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र पाठवून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली”, असं संभाजीराजे फेसबुकवर म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीदेखील एसईबीसीच्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सामावून घेण्याची विनंती नितीन राऊत यांना पत्राद्वारे केली आहे. मेटे यांनी ऊर्जामंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.

हेही वाचा :

मुंबईतील 7 डिसेंबरचा ओबीसी समाजाचा नियोजित मोर्चा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : प्रकाश शेंडगे

SEBC आणि OBC एकच, भाजपने मूर्ख बनवलं, नितीश कुमारांचा जो मुद्दा, तोच माझाही मुद्दा : हरिभाऊ राठोड