दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, म्हणाल्या, माझा भाऊ..
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मोठे विधान केले. हेच नाही तर त्यांनी विलिनीकरणावर भाष्य केले.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं, असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला होता. सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सतत ही चर्चा रंगताना दिसत असतानाच आता सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, तुम्हाला या विलीनीकरणाच्या गोष्टींचा कंटाळा आला नसेल पण मला कंटाळा आलेला आहे. या विषयावर मी यापुढे बोलणार नाही. दादा आणि आमच्या नेत्यांचे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची विलीनीकरणावर चर्चा झाली होती. तारीख ठरली होती हे सत्य आहे.
माझा भाऊ दादा गेला त्यानंतर या चर्चांना आमच्याकडून पूर्णविराम दिलेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काय चर्चा होतात त्यांच्याशी आमचे देणे घेणे नाही. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियांवर काहीही बोलत नाही. माझ आणि माझ्या भावाच नात जवळच होत तो ओलावा कायम राहील. आमच्या नेत्यांशी ही चर्चा होते तर त्यात चुकीच काय..
महागाई, दुष्काळ, पॉलिसी मेकिंग अश्या अनेक गोष्टी चर्चेसाठी आहेत. आज विलीनीकरणावरच बोलेन जे विचारायचं ते विचारा मात्र यापुढे मी शांत बसेन. मला या चर्चांचा कंटाळा आल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. विलिनीकरणावर पुन्हा बोलणार नसल्याचेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. माझा दादा गेला आणि तो विषय आमच्यासाठी संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दादा गेल्यानंतर विलिनीकरणाचा विषय आमच्या मनातही राहिला नाही. तो विषय आमच्यासाठी तिथेच संपला आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, त्यावर स्पष्ट बोलताना आता सुप्रिया सुळे दिसल्या. सत्तेत सहभागी होणार नसल्याचे सांगतानाही सुप्रिया सुळे दिसल्या. लोकशाहीवर आमचा विश्वास असल्याचे मोठे विधान सुप्रिया सुळे यांनी केले.