सर्व ठिकाणी आंदोलन सुरु, काहीतरी चुकतंय.. सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान..
पुण्यातील डीजे प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. ज्यांनी सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे म्हटले. जरांगे यांच्या उपोषणावरही बोलताना सुप्रिया सुळे दिसल्या. यादरम्यान त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

खासदार सुप्रिया सुळे आज नागपूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी डीजेच्या मुद्द्यावर भाष्य केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, वाद खुपच टोकाला गेला आहे. सरकारला विनंती आहे, सर्वांना एकत्र बोलवुन मार्ग काढणे गरजेच आहे. शिक्षणाच्या माहेरघरात खाकिची भीती राहिली नाही. अजून आपले मुख्य सण येणे बाकी आहेत. यादरम्यान त्यांनी नागपूरचे उदाहरण देखील दिले. भंडारे प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, किती दुर्दैवी आहे. फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आपला. काय चालले आहे राज्यात. सरकारने लक्ष घातले पाहिजे. काकडेंवर बोलताना सुळे यांनी म्हटले की, नाचण्याचा विरोध नाही. सुप्रिम कोर्ट काय सांगते, नियम कायद्यात. नागपुरात कायदा चालु शकतो तर राज्यात का नाही?
सण साजरे करणे आपली संस्कृती आहे. हात उगारने चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. शिक्षण विभागाच्या कारभारावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, राज्य आणि देशातली स्थिती खूप चिंताजनक आहे. काळानुसार सर्वांना बदलावे लागते. मुलांनी कोणत्या परिक्षेचा अभ्यास करायचा? मुल खूप जास्त यात भरडली जात आहेत.
नीटही द्यायची 12 वीची परीक्षाही द्यायची. सर्वच मुले याच भरडली जात आहेत. ते सत्तेत आहे का नाही, त्यांच्या नेत्यांना सांगा तुमच्या मंत्री आणि आमदारांना त्यांना आवरा. गुलाबराव पाटील यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी बोलणे बंद केले आहे.
मुंबई दहिहांडी मृत्यु प्रकरणावर बोलताना सुळे यांनी म्हटले की, सुरक्षा हा घटक खुप महत्वाचे आहे. आपली आई, बायको आणी बहीन आपली वाट पाहात आहेत. सुरक्षेला प्राधान्य असले पाहिजे. जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, चिंताजनक आहे. सर्व ठिकाणी आंदोलन सुरु आहे. 200 आमदारांचे सरकार आहे.
काहीतरी चुकतंय. सरकारने आत्मचिंतन केले पाहिजे.