AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी कर्मचाऱ्यांना 6000 हजार रुपये दिवाळी भेट ! आणि 12,500 रुपये सण उचलही मिळणार

एसटीच्या कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर या सणासाठी १२,५०० रुपयांची उचल देखील मिळणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना 6000 हजार रुपये दिवाळी भेट ! आणि 12,500 रुपये सण उचलही मिळणार
| Updated on: Oct 13, 2025 | 7:20 PM
Share

राज्यभरातील ८५ हजाराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. यंदाच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपयांची दिवाळी भेट ( सानुग्रह अनुदान ) देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम १२,५०० रुपयांची सण उचल देखील मिळणार आहे. तसेच वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे  एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावर आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे सू्त्रांकडून समजते.

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आपल्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी चक्का जाम आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता. या आंदोलनामुळे एसटीच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता होती. मात्र, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आहे. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना ६००० रुपये दिवाळी भेट आणि १२,५०० रुपये उचल देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता यंदाची दिवाळी गोड जाणार आहे. या निर्णयात सरासरी ७५०० वेतनवाढ फरक हप्ता प्रति महिन्याला देण्याचे देखील मान्य करण्यात आले आहे. एसटी महामंडळाला त्यासाठी सरकार दर महिन्याला ६५ कोटी रुपये देणार आहे.

आंदोलनाचा निर्णय स्थगित ?

एसटीमधील महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील १६ संघटनाआणि अन्य एक महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनानी सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ पासून चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत कामगार संघटनांची एक बैठक झाली. या बैठकीत बहुतांशी मागण्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे १३ ऑक्टोबरच्या रात्रीपासून चक्काजाम आंदोलनाचा निर्णय मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहेत मागण्या

२०१८ पासून एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक देण्यात आलेला नाही.  सन २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची एकूण ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम  मिळालेली नाहीत. थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.