
Ladki Bahin Yojana : घोषणा झाल्यापासून काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही वर्षभरानंतरही पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांसाठी दरमहा 1500 रुपये देण्याची टघोषणा गेल्या वर्षी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री यअजित पवार यांनी केली आणि एकच गदारोळ झाला. महायुतीसाठी ही योजना चांगली लाभकारक ठरली असली तरी विरोधकांनी त्यावरून आक्रमक भूमिका घेत योजनेला विरोधही दर्शवला होता. मात्र तरीही राज्यातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अरज केला, त्यापैकी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहेत.
मात्र या योजनेबद्दल आता एक नवी , मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण गेल्या 5 महिन्यांत या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
लाडकी बहीण योजनेची क्रेझ ओसरली ?
महायुतीच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरलेल्या लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वर्षभरापासून कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याने दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यातही जमा झाले,.
महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मागील लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि प्रभावी अंमलबजावणीकडेही लक्ष दिले. याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. न भूतो असा विजय महायुतीचा झाला. परंतु, यानंतर या योजनेची छाननी करून लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले.
मात्र, आता याच लाडकी बहीण योजनेची क्रेझ ओसरली का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पाच महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेकडे पाठ फिरवली का, अशी कुजबुज सुरू झाली आहे.
योग्यवेळी वाढणार मानधन
आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना पडताळणी स्थगित केल्याचे सांगितले जात असून, योग्यवेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आली आहे. लाडकी
बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे 1500 रुपये मानधन योग्यवेळी वाढविले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
योजनेचा घेतला गैरफायदा
मात्र याच योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचेही वेळोवेळी समोर आले. काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली, त्यांचं मानधन थांबवण्यात येणार आहे. तर महिलांसाठीच ही योजना असतानही, काही ‘हुशार’ भावांनी ओळख पटून नये म्हणून हुशारी करत आपला फोटो लावण्याऐवजी मोटारसायकलचा फोटो लावला आणि योजनेसाठी लाभार्थी ठरत ते पैसे घेतले. मात्र आता अशा घुसखोरांचे अनुदान थांबवण्यात आले आहे. प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पात्र असूनही अन्याय झालेल्या भगिनींवरील अन्याय दूर केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.