Devendra Fadnavis : उनको नीचे जात का बताकर, नवनीत राणांना पोलीस हीन वागणूक देत असल्याचा फडणवीसांचा गंभीर आरोप

नवनीत राणा यांनी आपल्याला जेलमध्ये अत्यंत वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. 23 तारखेला रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये पाणीही देण्यात आले नाही. तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे, त्यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्क नाकारण्यात आला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

Devendra Fadnavis : उनको नीचे जात का बताकर, नवनीत राणांना पोलीस हीन वागणूक देत असल्याचा फडणवीसांचा गंभीर आरोप
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 6:17 PM

मुंबईः हनुमान चालीसा म्हणण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना दलित असल्यामुळे वाईट दर्जाची वागणूक दिली आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकून अशी मागणूक दिली जात असेल तर महाराष्ट्राचं पुरोगामित्व आता संपलेलंय असं म्हणण्याची अवस्था आली आहे. या सरकारच्या संदर्भात संघर्षाशिवाय पर्याय नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस (Devednra Fadanvis) यांनी केला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यानंतर मातोश्रीवर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली आहे. मात्र पोलिसांच्या कस्टडीत असताना आपल्याला वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

नवनीत राणा, रवी राणा कोणत्या जेलमध्ये?

मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आग्रही असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माघार घेतल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. रविवारी वांद्रे येथील सुटीकालीन न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. राणा दाम्पत्याविरोधात राज द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांची रवानगी भायखळा कारागृहात तर आमदार रवी राणा यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

नवनीत राणा यांचे काय आरोप?

दरम्यान,  जेलमध्ये असलेल्या नवनीत राणा यांनी आपल्याला जेलमध्ये अत्यंत वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. 23 तारखेला रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये पाणीही देण्यात आले नाही. तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे, त्यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्क नाकारण्यात आला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

इतर बातम्या-

Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल

Sher Shivraj Collection: ‘शेर शिवराज’चे शोज हाऊसफुल! पहिल्या दिवशी दणक्यात कमाई