AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sher Shivraj Collection: ‘शेर शिवराज’चे शोज हाऊसफुल! पहिल्या दिवशी दणक्यात कमाई

दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'शेर शिवराज' (Sher Shivraj) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळतोय. 'केजीएफ: चाप्टर 2', 'जर्सी' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांकडून टक्कर असतानाही या चित्रपटाचे पहिल्या तीन दिवसांत 500 हून अधिक शोज हाऊसफुल झाले आहेत.

Sher Shivraj Collection: 'शेर शिवराज'चे शोज हाऊसफुल! पहिल्या दिवशी दणक्यात कमाई
Sher ShivrajImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 25, 2022 | 4:13 PM
Share

दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळतोय. ‘केजीएफ: चाप्टर 2’, ‘जर्सी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांकडून टक्कर असतानाही या चित्रपटाचे पहिल्या तीन दिवसांत 500 हून अधिक शोज हाऊसफुल झाले आहेत. ऐतिहासिक कथानक असलेल्या या चित्रपटाचे महाराष्ट्रातील शोज दुसऱ्या दिवशी दुपटीने वाढवण्यात आले. इतकंच नव्हे तर छोट्या ऑडीवरून मोठ्या स्क्रीन्सवर हे शोज लावले जाऊ लागले आहेत. 22 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 1.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाचा केलेल्या वधाची घडामोड आपल्या सर्वांनाच माहित आहे. या वधामागची कथा चित्रपटात सांगण्यात आली आहे. ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ हा चौथा चित्रपट आहे. (Box Office Collection)

प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची घटना ही सर्वांत मोठी असली तरी त्यामागे असलेलं त्यांचं युद्धकौशल्य, रणनिती, आयुर्वेदाचा अभ्यास, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल केलेला अभ्यास यांसारख्या अनेक बारिकसारिक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या दिग्पालच्या तिनही चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती.

या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत मृणाल कुलकर्णी, मुकेश ऋषी, विक्रम गायकवाड, माधवी निमकर, ईशा केसकर, अजय पुरकर, दीप्ती केतकर, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, वैभव मांगले, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, वर्षा उसगांवकर अशी कलाकारांची मोठी फौज आहे.

हेही वाचा:

Sher Shivraj Review: ‘शेर शिवराज’ची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम

Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटातील बाळासाहेबांच्या भूमिकेवरून उचलला पडदा; सोशल मीडियावर ‘गुरुपौर्णिमा’ गाण्याची चर्चा

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.