Bhandup Bus Accident : भांडूपमधील काळरात्री चौघांचा बळी, बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या 25…

भांडूप पश्चिमेला काल रात्री झालेल्या भीषण बस अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले. रिव्हर्स घेताना इलेक्ट्रिक बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि अनेक निष्पाप नागरिक चिरडले गेले. मृतांची नावे समोर आली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले. या घटनेने मुंबई हादरली आहे.

Bhandup Bus Accident : भांडूपमधील काळरात्री चौघांचा बळी, बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या 25...
भांडूप येथील अपघातात चौघांचा मृत्यू
Image Credit source: social media
| Updated on: Dec 30, 2025 | 11:57 AM

भांडूप पश्चिमेला स्टेशनजवळ काल रात्री झालेल्या बस अपघाताने (Bhandup Bus Accident ) अख्खी मुंबई हादरली आहे. रात्री 10 च्या सुमारास कामावरून परतलेले लोक घरी जाण्याच्या गडबडीत होते, काही चालत होते, काही बसच्या लाईनमध्ये उभे राहून वाट बघत होते, मात्र त्याचवेळी इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला. रिव्हर्स घेत असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि अनेक निष्पाप लोकांना बसची धडक बसली, तर काही जण चिरडले गेले. ब्रेकचे आवाज, लोकांच्या किंकाळ्या, व्हिवळणं यात रात्रीची शांतता चिरली गेली आणि सगळीकडे गोंधळ माजला. या दुर्दैवी अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून आणखी 10 जण जखमी झालेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याचे समजते.

मृतांची नावं समोर

बलखाली चिरडून अनेक लोकं जखमी झाले. काही जण बसच्या लाईनीत उभे होते, मात्र त्यांच्या मागून बस आल्याने अनेकांना ते कळलंच नाही. रिव्हर्स घेताना ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि बस वेडीवाकडी होत मागे गेली. उभ्या असलेल्या अनेक लोकांना धडकली, कित्येकांनी जीव वाचवत उड्या मारल्या, पळ काढला. पण काहींना तेवढीही संधी मिळाली नाही. मागून बस आल्याने अफरातफरी माचली, काही जण धडकेने खाली कोसळले, आणि उठूच न शकल्याने ते बसच्या चाकाखाली अक्षरश: चिरडले गेले. त्यात चौघांचा मृत्यू झाला. तर काही लोकं जखमी झालेत.

Bhandup Bus Accident : घरी जाण्याची लगबग, बसची लाईन आणि किंकाळ्या.. रिव्हर्स घेताना आक्रीत घडलं, भांडूप अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर !

मृत नागरिकांची नावं

1) प्रणिता संदीप – वय 35

2) वर्षा सावंत – वय 25

3) मानसी मेघश्याम गुरव – वय 49

4) प्रशांत शिंदे – वय 35

या चौघांचा मृत्यू झाला आहे.

जखमींची नावं

1) प्रशांत लाड – वय 51 – रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

2) नारायण भिकजी कांबळे – वय 49 – रुग्णालयात उपचार सुरू

3) मंगेश मुकुंद दुखंडे – वय 45 – उपचार सुरू

4) ज्योति विष्णु शिर्के – वय 55

5) शीतल प्रकाश हडवे – वय 39 – किरकोळ दुखापत, प्रकृती स्थिर

6) रामदार रुपे – वय 59 – किरकोळ दुखापत, प्रकृती स्थिर

7) प्रताप कोरपे – वय 60 – उपचार सुरू

8) रविंद्र घाडिगांवकर – वय 56 – रुग्णालयात उपचार सुरू

9) दिनेश सावंत – वय 49 – उपचार सुरू , प्रकृती स्थिर

10) पूर्वा – वय 12 – रुग्णालयात उपचार सुरू

बसचालक ताब्यात 

या आपघातास जबाबदार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. बस चालवताना त्याने मद्यप्राशन केलं होतं का, तो चालक नवीन होता की अनुभवी? बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? अशा अनेक पैलूंचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं दु:ख

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भांडूप अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. दुर्घटनेतील दुर्दैवी मृतांस श्रद्धांजली त्यांनी वाहिली, तसेच या प्रकरणी पूर्ण चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल असे आश्वासनही त्यांनी दिलं.