Rain Updates: मुंबईत पुढील तीन दिवस मुसळधार; रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड आलर्ट; कुठे मुसळधार तर कुठे मध्यम पाऊस

| Updated on: Jul 05, 2022 | 5:07 PM

मुंबईत 5,7 आणि 8 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाटी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Rain Updates: मुंबईत पुढील तीन दिवस मुसळधार; रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड आलर्ट; कुठे मुसळधार तर कुठे मध्यम पाऊस
Follow us on

मुंबईः राज्यात सध्या पावसाने जोरदार (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुढील 5 दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कोकण परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याने रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील (Ratnagiri, Raigad Red Alert) गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पाणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासनाकडूनही जोरदार हालचाली चालू असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

रायगड, रत्नागिरींली रेड आलर्ट

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस आहे. सोमवारपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली असल्याने कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जोरदार पाऊस पडत असल्याने दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

कोकणात दरड कोसळण्याची शक्यता

कोकणातून महत्वाच्या मार्गवर दरड कोसळण्याची शक्यता असल्यान काही मार्गही बंद करण्यात आले आहेत. आजपासून पुन्हा एकदा कोकण परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड आलर्ट देण्यात आला आहे.

कोकणसह इतर जिल्ह्यात पाऊस

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्याबरोबर पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणखी पाऊस कोसळणार आहे.

नागपूर, वर्धा, वाशिममध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस

तर नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्येही पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता असून विजांच्या गडगडाटसह पावसाची शक्यता आहे. तर उस्मानाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यातून 6 आणि 7 रोजी हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे.