AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदी कायम, कोर्टाचा तो निर्णय तुर्तास कायम

मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम राहील, असं सध्या कोर्टाने म्हटलं आहे. आगामी चार आठव्यांनी याच प्रकरणावर न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.

मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदी कायम, कोर्टाचा तो निर्णय तुर्तास कायम
mumbai kabutar khana
| Updated on: Aug 13, 2025 | 4:34 PM
Share

Kabutar Khana Ban : मुंबईमध्ये कबुतर आणि कबुतरांना दिले जाणारे खाद्य हा वादाचा मुद्दा झाला आहे. मुंबईत पालिकेने दादर तसेच इतर ठिकाणावरचे कबुतरखाने बंद केलेले आहेत. हे प्रकण न्यायालयापर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा ही बंदी उठवावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. तसेच दिवसाचा ठराविक वेळ कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. आता याच मागणीसंदर्भात न्यायालयाने आपला याआधीचा निर्णय कायम ठेवला असून तुर्तास कबुतरखान्यांवरील बांदीही कायम राहणार आहे. लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने मुंबई महापालिकेला सांगितले आहे.

काय मागणी केली होती?

मुंबई उच्च न्यायालयाने आपला अगोदरचा निर्णय सध्यातरी कायम ठेवला आहे. कबुतरखान्यांवर बंदी घातल्यानंतर काही लोकांनी कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी काही वेळासाठी तरी परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई महापालिकेकडे केली होती. त्यानंतर महापालिकेने कोर्टाकडे संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र या मागणीलाही कोर्टाने परवानगी दिलेली नाही. उच्च न्यायालयाने याआधी दिलेलाच निर्णय सध्या कायम ठेवला आहे. आता कबुतरखान्यांसंदर्भात चार आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार आहे.

महापालिकेने काय भूमिका घेतली होती?

महालक्ष्मी रेसकोर्सवर कबुतरांना खाद्य देण्यासाठी जागा द्या, अशी मागणी काही वकिलांनी केली होती. सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता आम्ही कबुतरांना खाद्य देऊ, अशीही भूमिका सरकारने न्यायालयापुढे मांडली होती. सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत अटी-शर्तींसह आम्ही कबुतरांना खाद्य द्यायला तयार आहोत, असे पालिकेने न्यायालयात सांगितले होते.

कोर्टाने काय निर्णय दिला?

न्यायालयाने आपला याआधीचा कबुतरखान्यांवरील बंदीचा निर्णय तुर्तास कायम ठेवले आहे. तसेच सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या, असे निर्देश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. तसेच लोकांची भूमिका लक्षात घेऊनच याबाबतीत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.