ठाणे TMT जाहिरात घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

| Updated on: Feb 24, 2021 | 4:29 PM

TMT मध्ये हा 27 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे TMT जाहिरात घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Follow us on

ठाणे : महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या TMT मध्ये हा 27 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा घोटाळा संगनमत करून झाल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.(Mumbai High Court orders filing of Thane TMT advertisement scam case)

काय आहे TMT जाहिरात घोटाळा?

ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या ठाणे ट्रान्सपोर्टच्या अनेक बस आणि त्यांचे थांबे आहेत. या बसेस आणि थांब्यावर जाहिरात लावण्यासाठी दरवर्षी कंत्राट दिलं जातं. मात्र, हे कंत्राट देण्यासाठी अनेक अटीशर्ती आहेत. असं असूनही एका कंत्राटदाराची पात्रता नसताना त्याला ठाणे महानगरपालिका आणि ठाणे ट्रान्सपोर्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगतमत करून कंत्राट दिलं. त्याचप्रमाणे या कंत्राटदाराने 2013 पासून ठाणे ट्रान्सपोर्ट विभागास कमी महसूल दिला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली आणि या सुनावणीदरम्यान गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

महापालिका अधिकाऱ्यांकडून तपासात अटकाव

वाटेगावकर यांनी केलेल्या जनहित याचिकेत ठाणे महानगर पालिका, ठाणे परिवहन विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना प्रतिवादी करण्यात आलं होतं. या प्रकरणात एसीबीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, एसीबीने चौकशी करताना ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी चौकशीची परवानगी देत नव्हते. ही बाब एसीबी च्या वकिलांनी कोर्टाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर कोर्टाने टीएमसीला जाब विचारला होता. त्यानंतर टीएमसीने चौकशी करण्याची परवानगी दिली.

कोर्टाच्या आदेशानंतरही धिम्या गतीनं तपास!

दरम्यान, एसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी 8 ते 9 महिने लागतील असं कोर्टाला सांगितल्यानंतर कोर्टाने त्याबाबत नाराजी व्यक्त होती. 3 महिन्यात या जाहिरात घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश एसीबीच्या वकिलांना दिले होते. असं असतानाही गेली दीड वर्ष कोणतीच कारवाई झाली नव्हती. अखेर आज या प्रकरणात कोर्टाने महत्वाचे आदेश दिलेत.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या महिला पदाधिकारीने लुबाडलं, शिवसेनेच्या महिला आघाडीनं चोपलं, कल्याणमध्ये तुफान राडा

ठाण्यात आता कोरोनाचे नियम न पाळल्यास थेट दुकाने, आस्थापना सील; पालिका आयुक्तांचे फर्मान

Mumbai High Court orders filing of Thane TMT advertisement scam case