मुंबईत पुन्हा धक्कादायक प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचं सेवन, तब्बल…; पोलिसांकडून कडक कारवाई

मुंबईत पुन्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणांनी ड्रग्जचं सेवन केल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत पुन्हा धक्कादायक प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचं सेवन, तब्बल...; पोलिसांकडून कडक कारवाई
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 2:04 PM

मुंबईत पुन्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्समधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचं सेवन केल्याचा संशय आहे. या संशयाच्या आधारे अँटी नार्कोटिक्स सेलने मोठी कारवाई केली आहे. अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनच्या माध्यमातून 55 जणांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर या तपासणीदरम्यान 12 जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह झाली आहे. आता पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्समधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सेवन केल्याच्या संशयावरून अँटी नार्कोटिक्स सेलने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तपासणीदरम्यान 12 जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे प्राथमिक तपासणीत संकेत मिळाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व १२ जणांना ताडदेव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. ताडदेव पोलिसांकडून १२ जणांना जवळच्या रुग्णालयात मेडिकलसाठी दाखल केलं.  वैद्यकीय तपासणी आणि अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या व्हॅनचा प्रत्यक्ष पहिल्यांदा वापर करण्यात आला. या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी व्हॅनच्या माध्यमातून पहिली कारवाई करण्यात आली.पोलिसांकडून या व्हॅनच्या माध्यमातून झालेली ही पहिलीच कारवाई यशस्वी ठरली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून सर्व मोठ्या कार्यक्रमांवर आणि कॉन्सर्टवर पोलिसांची करडी नजर असणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

Loading...

गोरेगावमध्ये घडला होता धक्कादायक प्रकार 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट वादग्रस्त ठरला होता. मुंबईतील गोरेगावमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये भयंकर घटना घडली होती. या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर एका तरुणीची प्रकृती गंभीर झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता.गोरेगावमधील लाईव्ह कॉन्सर्ट 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तीन ते चार हजार गर्दी केली होती. या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान बहुतांश तरुणांनी जास्त प्रमाणात मद्यपान आणि ड्रग्ज घेतल्यामुळे काही तरुणांना त्रास झाला होता. याच कॉन्सर्टमध्ये अति ड्रग्जचं सेवन केल्याने दोन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली होती. जोगेश्वरीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us