
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वाचं लक्ष अत्यंत महत्वाच्या अशा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर लागलं आहे. मुंबईचा महापौर कोण होमार यावरून गेल्या काही दिवसांत बरीच चर्चा सुरू असून, भाजाप, शिवसेना, मनसे यांच्यात वाक् युद्ध रंगल्याचं बघायला मिळालं. त्यातच कृपाशंकर सिंह यांनी उडी मारून मारून मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार असं विधान केलं होतं.महापौर नेमका कोणाचा आणि कोणत्या भाषेचा होणार, हा या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे. यासंबंधी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.
इथे जहय महाराष्ट्रच चालणार, वातावरण बिघडवू नका
मुंबईमध्ये महापौर कोणाचा ही शंका असताच कामा नये. मुंबईत मराठीच महापौर होईल. पण आता भारतीय जनता पक्षाने सुरू केलंय की मुंबईचा महापौर हिंदू होईल. हे लफंगे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का ? बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईतूनच हिंदुत्वाचा लढा सुरू केला हे लक्षात ठेवा . पण ही मुंबई मराठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, पण शिवाजी महाराज मराठी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहीलं, ते मराठी आहेत ना. आम्हाला हिंदुत्वाचं खूळ लावू नका, आमच्या नसांनसांत रक्ताच्या प्रत्येक थेंबात हिंदुत्व आहे. पण मुंबईचा महापौर मराठीच होणार असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं. इथे ‘जय महाराष्ट्र’ चालणार, ‘जय श्रीराम’ आमच्या हृद्यामध्ये आहे. पण इथे जय महाराष्ट्र , जय भवानी, जय शिवाजी हाच नारा चालणार, वातावरण बिघडवू नका, असं म्हणत राऊतांनी थेट इशारा दिला.
बीएमसी निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि इतर मोठ्या नेत्यांना स्टार प्रचारक बनवण्याच्या भाजपच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. काही बाहेरील लोक मुंबई विकण्याचा आणि त्याचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही लढाई ‘मुंबई वाचवण्यासाठी’ आहे याचा पुनरुच्चार राऊतांनी केला.
मोहन भागवतांनीही मराठीत बोलावं ना..
देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा आहेत. प्रत्येक भाषेला समान महत्व आहे. जिथे राहता तिथली भाषा शिकली पाहिजे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावरही राऊतांनी टिपण्णी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नेहमी हिंदीत बोलतात. पण संघाचं मुख्यालय नागपुरात आहे, मग त्यांनी मराठीत बोललं पाहिजे, सर्व कारभार मराठीतच केला पाहिजे ना अशा शब्दांत राऊत यांनी भागव यांच्यावर टीका केली.