Mumbai Municipal Election Results : मुंबई महापालिका निवडणूक निकालात पुन्हा मोठा ट्विस्ट, आकडे फिरले, धाकधूक वाढली

जवळपास सर्वच महापालिका निवडणुकांचे निकाल आता हाती आले आहेत. राज्यात भाजपला मोठं यश मिळालं असून, मुंबईमध्ये आज सुरुवातीपासूनच भाजप आणि शिवसेना शिंदे गट आघाडीवर होते, आता पुन्हा एकदा निकालात ट्विस्ट पहायला मिळत आहे.

Mumbai Municipal Election Results : मुंबई महापालिका निवडणूक निकालात पुन्हा मोठा ट्विस्ट, आकडे फिरले, धाकधूक वाढली
Mumbai Municipal Election Results
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 10:21 PM

जवळपास आता सर्वच महापालिका निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. राज्यात भाजपाला मोठ यश मिळालं आहे. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात भाजपला एकूण 1426 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर असून शिवसेना शिंदे गटाला राज्यात 403 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसनं देखील जोरदार मुसंडी मारली असून, राज्यात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला 317 जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही.

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच भाजप आणि शिवसेना शिंदे गट आघाडीवर होते. मात्र काही वेळापूर्वी भाजपचं संख्याबळ कमी झाल्यानं भाजप शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं होतं. त्यावेळी भाजप शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमतासाठी पाच जागांची गरज होती.  तर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत अचानक मुसंडी मारल्यामुळे काँग्रेस किंगमेकरची भूमिका बजावू शकतं, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मुंबईमध्ये काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत.

Live

Municipal Election 2026

07:59 PM

Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...

07:46 PM

BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...

10:32 PM

BMC Election Result 2026 : आकडे खाली-वर होत होते, आता मुंबईत स्थिती काय?

09:03 PM

बोरिवलीमध्ये भाजपची विजयी रॅली

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

मात्र त्यानंतर थोड्याच वेळात ही परिस्थिती आता पूर्णपणे बदलली आहे. मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण जागा 227 असून स्पष्ट बहुमतासाठी 114 जागांची आवशकता आहे. आता  फक्त एकाच जागेचा निकाल बाकी असून शिवसेना शिंदे गट आणि भाजपला मुंबईत एकूण 116 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे महायुतीचं टेन्शन कमी झालं आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची धाकधूक वाढली आहे. शिवसेना आणि मनसेच्या युतीला मुंबई महापालिकेत एकूण 73 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे बहुमताच्या आकड्यापासून दूर असून, काँग्रेसने पाठिंबा दिल्यास देखील बहुमताचं गणित जुळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत दहा ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.