बापटांची ‘ती’ बाब पाहून मी चकित व्हायचो, गिरीश बापट यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया…

पुण्याचे खासदार तथा भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहत असतांना ते भावुक झाले होते.

बापटांची 'ती' बाब पाहून मी चकित व्हायचो, गिरीश बापट यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 2:34 PM

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक झाले होते.

खासदार गिरीश बापट यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती.

सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. या पूर्वी ते पाच वेळेला पुण्याचे आमदार झाले आहेत. कसबा मतदार संघातून गिरीश बापट निवडून येत होते. पुणे महानगर पालिकेत सत्ता नसतांना ते स्थायी समितीचे सभापती झाले होते हे त्यांच्या राजकारणाचे कसब होते.

राष्ट्रीय स्वयंमसेवक संघ ते खासदार हा गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. पुण्यातील राजकारणात गिरीश बापट यांनी अनेकदा महत्वाची पदे भूषवली आहे. त्यामुळे गिरीश बापट यांचा दांडगा जनसंपर्क होता.

राजकारणापलीकडे गिरीश बापट यांचे इतर पक्षातील अनेक नेत्यांचे संबंध होते. त्यामुळे गिरीश बापट हे सर्वांना परिचित होते. गिरीश बापट यांचा कसबा मतदार संघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा.

खासदार गिरीश बापट हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. काही महिन्यापूर्वी गिरीश बापट यांना त्रास झाल्याने त्यांच्यावर महिनाभर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले होते.

मात्र आज पुन्हा तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच गिरीश बापट यांचे निधन झाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.