
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. जवळपास ही पाचवी धमकी आल्याची समोर येत असून संजय राऊत यांनी यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी मला धमकी आली तेव्हा तुम्ही त्याची चेष्टा केली असे म्हणत गृहमंत्री यांच्यावर निशाणा साधला. ज्यांना सुरक्षेची गरज आहे त्यांना सुरक्षा नाही पण ज्यांना मुंगी सुद्धा चावणार नाही अशा काही जणांना सुरक्षा दिली आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या चाळीस आमदारांना टोला लगावला आहे.
याशिवाय मागे हनुमान चालीसा म्हणणाऱ्या बाईला तुम्ही केंद्रीय सुरक्षा दिली. अनेक जणांना केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. हा महाराष्ट्र पोलिसांचा अपमान असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे धमकी आली तेव्हा चेष्टा केली. त्यामध्ये अशा धमक्यांना तुम्ही चेष्टा समजतात आणि एका चुंबन प्रकरणात तुम्ही चौकशी लावतात असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
कर्तव्य तत्पर मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलिसांना मी माझ्या धमकीची माहिती दिली. त्याची चेष्टा केली आणि चाळीस गद्दार आमदारांना पोलिसांची फौज दिली, त्याचा आम्हाला आनंद कारण त्यांना मुंगी चावणार नाहीये.
तुम्ही सगळ्यांचे गृहमंत्री आहात. एका टोळीचे गृहमंत्री नाहीत. धमक्यांना आम्ही घाबरत नाही आम्ही किरकोळ समजतो असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
आम्ही घेतलेल्या भूमिका त्यांना अडचणीच्या वाटत असतील म्हणून धमक्या. दाऊद सारखी गॅंग आम्ही बघितली आहे. त्यामुळे अशा गॅंग खूप बघितल्या आहेत. पण मुसेवाला गायकाची हत्या केली आहे. आणि त्या हत्येचे धागेदोरे पुण्यातील होते.
सुरक्षा मागितली नाही आणि मागणार नाही. पुरावे दिलेले असतांना त्याची चेष्टा करतात. तुमची त्या पदावर बसण्याची लायकी नाही म्हणत संजय राऊत यांनी गृहमंत्री यांच्यावरच निशाणा साधला आहे. कशावरही एसआयटी स्थापन करतात अशी नाराजी व्यक्त केली आहे.
कायदा सुवस्था राखण्यासाठी तुमचा प्राध्यान्यक्रम ठरवा. राज्यात दंगली घडत आहे. त्यात तुम्ही राज्य चालवू शकत नाही तर जनता निर्णय घेईल. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलले पाहिजे म्हणत संजय राऊत यांनी आवाहन दिलं आहे.