AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ललित पाटील याच्या चालकाने नदीत ड्रग्स फेकले…मुंबई पोलिसांनी नाशिक गाठत…

Lalit Patil : ससून रुग्णालयातून ललित पाटील याचे ड्रग्स प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर यासंदर्भात गेल्या महिन्याभरापासून अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहे. ललित पाटील याच्या भावाने नाशिकमध्ये टाकलेला कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. आता त्याने फेकलेले ड्रग्स शोधून काढले जात आहे.

ललित पाटील याच्या चालकाने नदीत ड्रग्स फेकले...मुंबई पोलिसांनी नाशिक गाठत...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 29, 2023 | 11:23 AM
Share

मनोहर शेवाळे, मालेगाव, नाशिक | 29 ऑक्टोंबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ललित पाटील याच्या चालकाने नदी पात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढले जात आहे. पाच दिवसांपासून ड्रग्ससाठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने नाशिकमध्ये ऑपरेशन राबवले होते. नाशिक जिल्ह्यातील लोहनेर ठेंगोडा येथे असलेल्या गिरणा नदीत फेकलेला कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या टीमने ४ तास स्कुबा डायव्हरच्या मदतीने अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले होते. आता पुन्हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम नाशिकमध्ये आली आहे.

पुन्हा सुरु केला प्रयत्न

ललित पाटील याचा चालक सचिन वाघ याने नदीत फेकलेले ड्रग्स शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक पुन्हा रविवारी देवळा तालुक्यात आले. ठेंगोडा येथील गिरणा नदीवरील पात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढले जात आहेत.  रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने पुन्हा ड्रग्सचा शोध घेतला जाणार आहे. १५ फूट खोल नदीपात्रात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. तसेच हे ड्रग्स शोधासाठी गिरणा नदीवरील साठवण बंधाऱ्यातील पाणी सोडले गेले आहे. ललित पाटील याची पोलीस कोठडी सोमवारी संपणार आहे. यामुळे त्यापूर्वी माहिती जमा करण्यासाठी पोलिसांकडून तपासात गती देण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा ललित  पाटील याची कोठडी वाढवून पोलीस मागण्याची शक्यता आहे.

सुषमा अंधारे यांचा आरोप फेटाळला

ललित पाटील याचे एनकाउंटर केले जाईल किंवा त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू होईल, असा दावा पुणे येथील आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही हाच दावा केला होता. त्यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पोलीस कस्टडीमध्ये असणाऱ्या कोणत्याही आरोपीला धोका होत नाही. 24/7 हे आरोपी पोलिसांच्या निगराणीमध्ये आहेत. सुषमा अंधारे यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी राज्याच्या महासंचालकांकडे द्यावी, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?