Mumbai to pune railway update : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गाचे काम कुठपर्यंत आले ? मोठी अपडेट आली..

मध्य रेल्वेच्या कर्जत - लोणावळा येथील बोर घाटात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्याने रेल्वे मार्गावरील दगड माती वाहून गेली होती. ७ जुलै रोजी घडलेल्या अतिवृष्टीमुळे हा मार्ग बंद करण्यात आला होता. आता या मार्गावरील तिन्ही मार्गिका सुरळीत होणार आहे.

Mumbai to pune railway update : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गाचे काम कुठपर्यंत आले ? मोठी अपडेट आली..
Restoration of CR train services on South East Down line
| Updated on: Jul 16, 2026 | 5:46 PM

मध्य रेल्वेच्या कर्जत लोणावळा सेक्शनमध्ये ७ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे बोर घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग ठप्प झाला होता. त्यामुळे या दोन मेट्रो सिटीतील इंटर सिटी ट्रेन बंद झाल्या होत्या. तर या मार्गावरुन जाणाऱ्या अनेक ट्रेन रद्द तर उर्वरित ट्रेन दौंड मार्गे वळवण्यात आल्या होत्या. आता या घाट सेक्शनमधील पावसाने उसंत घेतल्याने तिन्ही मार्गिकांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे या तिन्ही मार्गिका कार्यरत झाल्याने पुन्ही मुंबई ते पुणे रेल्वे सेवा बहाल करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावर कर्जत ते लोणावळा सेक्शनमध्ये ७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने बोर घाटात दरडी कोसळल्याने या मार्गातील माती – दगड घसरल्याने मुंबई ते पुणे सेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेने २४ तास येथे युद्धपातळीवर दुरुस्ती काम सुरु केले. त्यानंतर १४ जुलै रोजी कर्जत आणि लोणावळा दरम्यानची  South East Down line पूर्ववत करण्यात आली होती. तर मधला मार्ग ७ जुलै रोजी दुरुस्त करण्यात आला होता. आता तिन्ही रेल्वे मार्गिका पूर्ववत झाल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.

खालील ट्रेन आता पूर्ववत करण्यात आल्या आहेत…

• 11302 Bengaluru-CSMT Udyan Express ही खडकी पर्यंत शॉर्ट टर्मिनेट केली होती. आता ती 17 जुलै पासून CSMT पर्यंत धावेल

• 12116 Solapur-CSMT Siddheshwar Express ही पुण्यापर्यंत धावायची आता ती 17 जुलै पासून CSMT पर्यंत धावेल

• 11301 CSMT-Bengaluru Udyan Express ही पुण्यापर्यंत धावायची आता ती 18 जुलै पासून CSMT पर्यंत धावेल

• 12115 CSMT- Solapur Siddheshwar Express ही ट्रेन Khadki पर्यंत धावायची आता 18 जुलैपासून CSMT पर्यंत धावेल

• 17411 CSMT- Kolhapur Mahalaxmi Express ही ट्रेन रद्द केली होती. आता ती 18 जुलै पासून पूर्ववत होत आहे.

• 17412 Kolhapur- CSMT Mahalaxmi Express ही ट्रेन रद्द केली होती आता ती Kolhapur 19 जुलै पासून कोल्हापूर ते सीएसएमटी धावेल.

• 09419 Ahmedabad-Tiruchirapalli Express ही ट्रेन surat-Manmad-Daund-Solapur वळवण्यात आली होती. आता ती चा 16 जुलै पासून पूर्ववत होत आहे.

• 12123/12124 CSMT-Pune-CSMT Deccan Queen आणि 12127/12128 CSMT-Pune-CSMT Intercity Express 16 जुलै पूर्ववत होत आहे.

 

Follow Us