AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत आजही कोसळणार मुसळधार पाऊस, 4-5 दिवस कसं असेल वातावरण ?

दोन दिवसांपासून मुंबईत वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई शहरांमध्ये बुधवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. आजही मुंबईत आणि आसपासच्या परिसरात पावसाचा अंदाज आहे

मुंबईत आजही कोसळणार मुसळधार पाऊस, 4-5 दिवस कसं असेल वातावरण ?
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 08, 2025 | 10:42 AM
Share

गेल्या दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावून मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवणारा पाऊस आजही मुंबईत आणि आसपसाच्या परिसरात कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबईसह किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे.

काल, मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. त्याच पार्श्वभूमीवर आजही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतच पावसाने हजेरी लावल्याने अनेक नागरिकांची धावपळ झाली, त्रेधातिरपीट उडाली. मात्र आजही पावसाचा इशारा देण्यात आल्याने मुंबईकरांनी त्या तयारीनेच बाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपासून मुंबईत वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई शहरांमध्ये बुधवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. दहिसर येथे सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत 40 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. तर काल संध्याकाळनंतर पावसाने अधिकच जोर धरला होता

लोकलवरही परिणाम

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत काल मुसळधार पाऊस सुरू झाला. कोस्टल रोडभोवती जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळला. त्याचा परिणाम लोकल सेवेवरही दिसून आला. मध्य आणि हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल गाड्या 10 मिनिटे उशीराने धावत होत्या. ठाणे ते पनवेल, ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते सीएसटी या लोकल गाड्याही 10 मिनिटे उशिराने धावत होत्या. अचानक आलेल्या या पावसाचा थेट परिणाम मध्य रेल्वेवर झाला.

पुढील 4 ते 5 दिवस पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता

राज्याचे हवामान सतत बदलत असते. कुठे तेजस्वी सूर्यप्रकाश आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील 4 ते 5 दिवसांसाठी हवामान अंदाज जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते.

दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पालघरच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार वादळ आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम मच्छिमारांवरही झाला आहे. डहाणू आणि पालघरमध्ये 40 ते 45 बोटींचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटी वादळाच्या तडाख्यात सापडल्या आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.

दोन दिवस कोकणात पावसाची शक्यता

रत्नागिरी- अरबी समुद्रात सध्या चक्रीय स्थिती असून त्यामुळेच कोकण किनारपट्टीवर यलो अलर्ट देण्यात आला आहे.  दोन दिवस कोकणात पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी भागात 30 ते 40 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7 आणि 8 मे, सिंधुदूर्गसाठा 8 मे, रायगड जिल्ह्यासाठी 6 आणि 7 मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. 48 तासांत कोकण किनारपट्टीच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.