
मुंबई : मुंबईत वेड्यासारख्या कोसळत असणाऱ्या पावसाने मुंबईची दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन बंद पडल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील विक्रोळी येथे काल २०० मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. मुंबईत जागोजागी कार आणि बेस्टच्या बस पडल्याने रस्त्यावरील ट्रॅफीक बंद आहे. शाळा तर आज बंदच ठेवण्यात आल्या होत्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सोडण्यात आले आहे. मुंबईची तुंबई झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
#MumbaiRain#MumbaiRains#SaturdayVibes
Mumbai lashed with 200mm+ rains from last night and roads turned into rivers 👇👇 pic.twitter.com/lB8e6t78hE
— Khan (@Khanmohammed12) August 16, 2025
मुंबई बाहेरुन कामासाठी स्थायिक झालेल्या लोकांचे गावातील आणि परराज्यातील नातेवाईक मुंबईची अवस्था चॅनलवर पाहून हादरले आहेत. मुंबईतील रस्त्यांना नदीचे स्वरुप आलेले आहे. अनेक ठिकाणी बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या कार पाण्यात बंद पडल्या आहेत. कमरेइतक्या पाण्यातून लोक चालत आपल्या आपले ठिकाण इच्छीत ठिकाण गाठत आहेत. मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाल्याने मोनोरेल आणि मेट्रो रेल्वेला तुफान गर्दी झालेली आहे. अनेक व्हायरल व्हिडीओत लोक कमरेइतक्या पाण्यातून छत्री घेऊन मार्ग काढताना दिसत आहे. ही छत्री तर नावालाच उरली आहे. कमेरेपर्यंत पाण्याने त्याचे शरीर भिजले आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
The newly built Vikrohli east-west flyover that was innaguarated in June this year was water logged today morning following an intense downpour. pic.twitter.com/nLL0Zzgyd9
— Richa Pinto (@richapintoi) August 19, 2025
मुंबईच्या मध्य रेल्वेने दुपारनंतर नांगी टाकली आणि लोकांचा खरा त्रास सुरु झाला. लोकल बंद असल्याने बेस्टचा आधार घ्यावा तर बेस्टलाही तुफान गर्दी आहे. बेस्टचे अनेक मार्ग वळवण्यात आले आहेत. वडाळा येथे पाणी साचल्याने हार्बरलाईनही बंद पडली आहे. एअरपोर्टवरही १४ हून अधिक फ्लाईट्स डायव्हर्ट कराव्या लागल्या आहेत. एअरलाईन्सच्या प्रवाशांना एडव्हायझरी जारी करावी लागली आहे. मुंबई ही सात बेटांपासून बनली होती. आता ही सात बेटं पुन्हा वेगळी होत आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
Kanjurmarg station railway tracks under water. #MumbaiRains pic.twitter.com/8UEpvdcFJx
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) August 19, 2025
मुंबईतील पाणी साचल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून लोक म्हणत आहेत की हा पाऊस नाही तर समुद्राचे पाणीच आत शिरले आहे.सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायलर होत आहे. एका मुलाचा कमरे इतक्या पाण्यातून छत्री घेऊन चालतानाचा व्हिडीओ पाहून ‘कमर तक हैं पाणी, क्या करेगी छत्री की नानी !’ असे मीम्स व्हायरल होत आहेत.
लोकांचा संताप सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. एका युजरने लिहीलेय की दर वर्षीची हेच कहानी आहे., पाण्यात बुडणारी मुंबई आणि प्रशासनाची बेफीकरी. कामावर जाणाऱ्या लोकांसाठी हे मुंबई स्पिरिट नाही तर कामावर जाणे मजबूरी आहे. दोन ते तीन तास संघर्ष करुन ऑफीसला पोहचायचे आणि ट्रेन पकडणे आणि रस्त्यातील खड्ड्यातून चालणे.
मुंबईतील पाऊस असो संकटस व्हायरल जरुर होते. जर तुम्ही मुंबई राहात असाल तर रेनकोट, छत्री आणि खूपसारी सहनशक्ती सोबत ठेवणे विसरु नका.