AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 मजली इमारतीचा भाग कोसळला, 15 ते 20 नागरिक मलब्याखाली दबल्याची भीती, विरार येथील धक्कादायक घटना

विरारच्या नारंगी फाटा येथे धक्कादायक घटना घडली असून अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला असून काही नागरिक अडकल्याची भीती वर्तवण्यात आलीये. दहा वर्षापूर्वीची इमारत असून महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती.

4 मजली इमारतीचा भाग कोसळला, 15 ते 20 नागरिक मलब्याखाली दबल्याची भीती, विरार येथील धक्कादायक घटना
Mumbai
| Updated on: Aug 27, 2025 | 8:47 AM
Share

मुंबई : विरार येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत एका बाजूला कोसळली आहे. या इमारतीमध्ये 15 ते 20 नागरिक इमारतीच्या मलब्याखाली अडकली असल्याची शक्यता आहे. रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली आहे. दहा वर्षापूर्वीची इमारत असून महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती. तरीही नागरिक या इमारतीमध्ये राहत होते. रात्री अचानक ही इमारत कोसळली आणि एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू केले.

विरारच्या नारंगी फाटा येथील रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारतींचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना रेस्क्यू करुन त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. शोधकार्य सुरु आहे. सध्या या इमारतीमध्ये 15 ते 20 नागरिक इमारतीच्या मलब्याखाली अडकली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली आहे. दहा वर्षापूर्वीची ही इमारत असून महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती. तरीही नागरिकांनी ही इमारतखाली केली नव्हती. पालिकेकडून अनेकदा यासंदर्भातील नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत मध्यभागी आहे आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चाळी असल्याने मदतकार्य पोहोचवण्यास अडथळा निर्माण होतोय. मोठे जेसीबी तिथे पोहोचू शकत नसल्याने मलबा काढणे अवघड झाले आहे.

सध्या ही रमाबाई अपार्टमेंट ही पूर्ण खाली करण्यात आली आहे. मात्र, मोठे जेसीबी पोहोचू शकत नसल्याने मदतकार्य कसे राबवावे आणि मलबा कसा बाहेर काढावा हा मोठा प्रश्न प्रशासना पुढे उभा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून जरी मदतकार्य राबवले जात असले तरीही अजून काही लोक या मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे. काही लोकांना आतापर्यंत वाचवण्यात देखील यश आलंय. ही इमारत पडल्याने परिसरात मोठा आवाज झाला होता.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा