
नुकताच शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार टीका केलीये. रामदास कदम यांनी परवाना रद्द करण्याच्या मुद्द्यावर अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलंय. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की,जितेंद्र आव्हाड यांचा धर्माच्या बाबतीत खूप अभ्यास आहे, त्यांनी धर्मगुरूच व्हायला पाहिजे. सावली बारच्या बाबतीत अर्धवट वकील अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत, असे त्यांनी म्हटले. तू राजीनामा मागणारा कोण, रामदास कदम यांनी ऍग्रिमेंट दाखवत केले काही खुलासे. शरद शेट्टींना चालवायला दिलं होतं हॉटेल, कॉलम 6 मध्ये असं म्हटलं आहे की, कोणताही बेकायदेशीर धंदा चालवणार नाही.
हॉटेल धंदा चालवेन, अटींचं भंग होणार नाही. कॉलम 7 मध्ये म्हटलं आहे की, काही कृत्य झाल्यास धंदा चालवणारे जबाबदार असतील. मालकाची जबाबदारी राहणार नाही. कलम 6 आणि 7 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे. अन्य गोष्टी आढळल्याने आम्ही तात्काळ त्याला बाहेर काढलं, दोन्ही लायसन्स तेव्हाच जमा केले आहेत. लायसन्स 13 तारखेला जमा केले आहेत आणि अनिल परबने 18 ला विधिमंडळात विषय काढला असल्याचे अनिल परब यांनी म्हटले.
या हॉटेलचा आणि गृहराज्यमंत्री यांचा काहीही संबंध नाही. राजीनाम्याचा विषयच येत नाही. हे महाशय दिशाभूल करताहेत, आम्ही लायसन्स पहिलेच जमा केलेले आहेत. नियमबाह्य यांनी हे विधानमंडळात हे विषय काढले आहेत. हे आरोप तात्काळ काढून टाकावेत आम्ही सभापतींना अर्ज दिलेला आहे. या गोष्टीला आम्ही कुठेही पाठींबा दिलेला नाही. ज्याला चालवायला दिलं होतं हॉटेल, त्यावर आम्ही तात्काळ कारवाई केली.
उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत. कावळ्याने कितीही काव काव केली तरी आम्ही त्याची दखल घेत नाही. डान्सबार सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत, असेही स्पष्टपणे रामदास कदम यांनी म्हटले. रामदास कदम यांनी संजय शिरसाट यांना सल्ला दिलाय. ते म्हणाले, सरकार म्हणजे आपण, आपण म्हणजे सरकार. आपल्या बापाचं काय जातंय असं म्हणता येणार नाही. एकेक पैसा सरकारचा योग्य त्या कामासाठीच लागला पाहिजे.
शिरसाट साहेब आपली शाब्दिक भूमिका थोडी बदलतील असं मला वाटतं. मनसे बार तोडफोडवर बोलताना ते म्हणाले की, त्यांचं खूप खूप अभिनंदन. महाराष्ट्रात जिथे जिथे लेडिज बार असतील ते सर्व साफ करून टाका असं मी योगेश दादाला सांगितलं आहे. वाशीमध्ये जो लेडिज बार योगेश दादाने बंद केला म्हणून हे सर्व घडलं आहे. काही पोलिसांनी योगेश दादाला फोन केले होते हे तुम्ही थांबवा, पण हे थांबवलं नाही म्हणून हेतुपुरस्सर योगेश दादाला बदनाम करण्यासाठी काही पोलिसांनी केलेलं हे कारस्थान आहे.
याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. हे पोलीस कोण आहेत याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत. यासोबतच रामदास कदम यांनी अनिल परब यांना इशारा देत म्हटले की, मी सर्वच पत्ते उघड करणार नाही. पण आमच्या अंगावर जे चालून आले त्यांच्यावर नेहमीच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे, कोणालाही सोडलेलं नाही आणि जे आमच्या मुळावर येण्याचा प्रयत्न करताहेत भविष्यात त्यांना उत्तर मिळेल.