AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : मालेगाव स्फोटाच्या निकालावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, अनेक गंभीर गोष्टी….

Devendra Fadnavis : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात काल 17 वर्षांनी निकाल लागला. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या निकालाकडे सगळ्या देशाच लक्ष होतं. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बद्दल बोलले आहेत.

Devendra Fadnavis : मालेगाव स्फोटाच्या निकालावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, अनेक गंभीर गोष्टी....
| Updated on: Aug 01, 2025 | 2:31 PM
Share

“कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने हिंदू टेरर किंवा भगवा आंतकवाद अशा प्रकारच नरेटिव तयार केलेलं, ते बस्ट झालं आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आपल्याला कल्पना असेल 1990 च्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारणत: 2000 च्या सुरुवातीला संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडल्या. अमेरिका, युरोपमध्ये दहशतवादाच्या घटना घडल्या. भारतात तर घडतच होत्या. यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते. त्यातून इस्लामिक टेररिजमच नरेटिव तयार झालं. ते भारताने तयार केलं नव्हतं” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“भारतात या नरेटिवचा आपल्या वोटबँकेवर परिणाम होतोय हे काँग्रेसच्या लक्षात आलं. कोणीच सर्व मुस्लिमांना दहशतवादी ठरवलं नव्हतं. पण तरीदेखील या ठिकाणी सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं यूपीएने षडयंत्र रचलं. हिंदू दहशतवाद हा शब्द तयार केला” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.

तुम्हाला ती वेळ माहित असेल

“2008 सालच षडयंत्र आता सर्वांसमोर उघड झालय. त्यावेळच्या सरकारने मतांच्या राजकारणासाठी हिंदू टेरर, भगवा दहशतवाद हे शब्द तयार केले. तुम्हाला ती वेळ माहित असेल, ज्यावेळी संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडत होत्या. एकप्रकारे इस्लामिक दहशतवाद चर्चेचा विषय होता” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

म्हणून हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली

“आम्हाला मतदान करणारे जे लोक आहेत, त्यांच्या मनात राग निर्माण होऊ नये किंवा त्यांना वाटावं आम्ही बॅलन्स करतोय, यासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनवण्यात आली. लोकांना अटक केली. हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी, पदाधिकारी यांना टार्गेट करण्याचं हे षडयंत्र होतं. त्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले” असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही असं करणार नाही

“ठोस पुरावे त्यांना मिळाले नाही. अनेक अधिकारी असे होते, ज्यांच्यावर भरपूर दबाव टाकण्यात आला. त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही असं बेकायद काम करणार नाही. हे षडयंत्र हळूहळू बाहेर येत आहे. त्यावेळी इस्लामिक दहशतवाद होता, आजही आहे. पण असं कोणी म्हटलं नव्हतं की, सर्व मुस्लिम दहशतवादी आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनेक गंभीर गोष्टी बाहेर येतील असं ते म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.