Pratap Sarnaik ED | संपत्ती जप्तीनंतर पहिल्यांदाच बोलले प्रताप सरनाईक, पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

ईडीच्या (ED Raid) प्रक्रियेला मी सहकार्य करत आहेत. त्यांनी दिलेल्या नोटिशीविरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. प्रताप सरनाईकांच्या प्रतिक्रियेतील 10 मुद्दे पुढील प्रमाणे-

Pratap Sarnaik ED | संपत्ती जप्तीनंतर पहिल्यांदाच बोलले प्रताप सरनाईक, पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त, शिवसेनेला ईडीचा दुसरा दणका
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 2:53 PM

मुंबईः शिवसेना आमदार (Shiv Sena MLA) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या 11.35 कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर ते प्रथमच त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या अनेक लोकप्रतिनिधींवर ही कारवाई सुरु आहे. पण माझा न्यायालयावर विश्वास आहे. NACL हे काय आहे, हेसुद्धा मी तपासणार आहे. ईडीच्या (ED Raid) प्रक्रियेला मी सहकार्य करत आहेत. त्यांनी दिलेल्या नोटिशीविरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. प्रताप सरनाईकांच्या प्रतिक्रियेतील 10 मुद्दे पुढील प्रमाणे-

  1. ईडीने जप्तीच्या कारवाईविरोधात न्यायालयात जाणार. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती ही कारवाई सुरु आहे
  2. मी काही गोष्टींचा तपास करीत आहे. अनेक गोष्टी मलाही पहिल्यांदाच कळाल्या आहेत.
  3. ईडीच्या जी काही प्रक्रिया त्याला सहकार्य केलं.
  4. माझ्याबाबत सुरू असलेल्या बातम्या पाहत होतो. माझी वस्तूस्थिती सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून मी बोलतोय.
  5. हिरानंदानी येथील स्वतःचं घर, आणि मीरारोड येथील जमीन अटॅचमेंट करण्याची नोटीस मला ईडीने पाठवली आहे. त्याविरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे.
  6. माझी मुलं माझ्या कंपनीत मला भागीदार आहेत.
  7. मी विद्यार्थी दशेतून राजकारणात आलोय. न्याय प्रक्रियेवरती माझा विश्वास आहे.
  8. केंद्राच्या आणि राज्याच्या संघर्षामध्ये या गोष्टी होणार आहेत.
  9. महाराज्यांनी स्वराज्याची स्थापण केल्यानंतर त्यांनाही अडचणी आल्या.
  10. मुख्यमंत्री आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्याच्यावर कानावर सगळ्या घातल्या आहेत. यापुढेही घालणार आहे.

इतर बातम्या-

सर्वात मोठी चाकं असलेली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स