AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत हादरली! एकतर्फी प्रेमातून अल्पवीयन मुलीची चाकूने सपासप वार करून हत्या, दुसऱ्यादिवशी जंगलात आढळला मृतदेह

mumbai crime news : मुंबईच्या कांदिवलीतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून नरधमाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या केली आहे

मुंबईत हादरली! एकतर्फी प्रेमातून अल्पवीयन मुलीची चाकूने सपासप वार करून हत्या, दुसऱ्यादिवशी जंगलात आढळला मृतदेह
| Updated on: Jul 11, 2026 | 8:58 AM
Share

मुंबईत दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वे मार्गवरील बोरिवलीत लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाची हत्या झाली होती. बोरिवलीनंतर आता कांदिवलीतून हृदय हेलावून टाकणी बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका 22 वर्षीय नराधमाने इयत्ता 12 वीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्यावर सपासप चाकून वार करून हत्या केली. या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्वेतील दामूनगर सातारा कॅम्पजवळ एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीची चाकूने चेहऱ्यावर 16 पेक्षा अधिक वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह जंगल परिसरात फेकला. पीडित मुलगी इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होती. पोस्टमार्टममध्ये आरोपीने मुलीच्या चेहऱ्यावर चाकूने 16 पेक्षा जास्त वार केल्याचे आढळून आले आहे .

अल्पवयीच्या मुलीच्या हत्येनंतर संपूर्ण कांदिवलीत दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. पोलिसांनी तांत्रिक पुरावाच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीची ओळख 22 वर्षीय सूरज वाघमारे अशी झाली आहे. आरोपी सूरजा हा दामूनगर लहूगड येथील सरस्वती चाळीतील रहिवासी आहे.

पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीवर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. तो आत्महत्येची धमकी देऊन तिला मानसिक त्रास देत होता. कुटुंबीयांनी याआधीही समता नगर पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते, पण कुटुंबीयांनी त्याचे भविष्य खराब होऊ नये म्हणून FIR दाखल केली नव्हती.

घटनेच्या एका रात्री आधी पीडित मुलगी घरातून बेपत्ता झाली. कुटुंबीय जेव्हा आरोपीच्या घरी गेले, तेव्हा त्यांनी अनभिज्ञ असल्याचे नाटक केले. दुसऱ्या दिवशी जंगलात सिद्धीचा मृतदेह सापडताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सध्या पोलीस आरोपी सूरजकडे कसून चौकशी करत आहेत. हत्येमागील संपूर्ण कट आणि घटनाक्रमाचा तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येने संपूर्ण कांदिवली हादरून गेली आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे