बापरे…! मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलच्या मसाला डोशात आढळला मेलेला उंदीर, ग्राहकाला मळमळ अन् उलट्या

rat found in dosa : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलच्या मसाला डोशात मेलेला उंदीर आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर ग्राहकाला मळमळ आणि उलट्या झाल्या. या घटनेनंतर अन्नाच्या गुणवत्तेवरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

बापरे...! मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलच्या मसाला डोशात आढळला मेलेला उंदीर, ग्राहकाला मळमळ अन् उलट्या
borivali news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 29, 2026 | 1:49 PM

मुंबईतील छोटे हॉटेल असो वा प्रसिद्ध हॉटेल….अन्नाच्या स्वच्छेतबाबत कोणीही फारसे नियम पाळत नसल्याचे अनेकदा उघड झालं आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा धडाका सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एफीडएकडून अनेक हॉटेलवर   कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत काही पदार्थात मेलेलं झुरळ आढळल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यानंतर एफडीएने संबंधित हॉटेल सील देखील केले होते. आता मुंबईतून आणखी एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. आता चक्क मसाला डोशात मेलेला उंदीर आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.  या घटनेनंतर हॉटेल मालकाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातून अन्नाच्या स्वच्छतेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोरिवली स्टेशनजवळ एल.टी. रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये खाद्यपदार्थात मृत उंदीर आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, अमित त्रिवेदी हे आपल्या दोन भावांसह आणि मुलासोबत या हॉटेलमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ खाण्यासाठी गेले होते. त्यांनी म्हैसूर मसाला डोसा ऑर्डर केला. डोशाचे काही घास खाल्ल्यानंतर त्यामध्ये छोटा मृत उंदीर आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा प्रकार लक्षात येताच अमित त्रिवेदी यांना धक्का बसला. त्यांना उलट्या सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी बोरिवली पोलिसांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली.  या घटनेमुळे हॉटेलमधील स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत आता या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाई होते का याकडे लक्ष लागलं आहे.

Loading...

चायनीज रेस्टॉरंटमध्येही उंदरांचा सुळसुळाट  

बोरीवली पश्चिम आयसी कॉलनी परिसरातील प्रसिद्ध चायनीज रेस्टॉरंटमध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉटेलमध्ये खाली नागरिक विश्वासाने अन्न सेवन होते. त्यावेळी वरती 5 ते 6 उंदीर फिरतानाचा व्हिडिओ मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी उघडकीस आणलाय.  या गंभीर प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अस्वच्छ वातावरणामुळे अन्न विषबाधा किंवा प्लेगसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झालाय.

याप्रकरणी मनसे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला आहे. नागरिक कष्टाचे पैसे देऊन हॉटेलमध्ये चांगल्या अन्नासाठी जातात. परंतु किचनमध्ये जो अस्वच्छतेचा कारभार सुरू आहे, तो ग्राहकांच्या जीवाशी खेळ आहे या हॉटेलची तात्काळ FDA आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने पाहणी करून सील ठोकले पाहिजे, प्रशासनाने कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे. याप्रकरणी किरण नकाशे यांनी FDA आणि BMC R / Central वॉर्ड आरोग्य विभागाकडे तक्रार नोंदवून परवाना रद्द करण्याची आणि हॉटेल बंद करण्याची मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us