AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; आता किती पैसे मोजावे लागणार?

मुंबईत प्रवास महागला आहे. मुंबईच्या एन्ट्री टोलनाक्यावरील दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. जाणून घ्या आता किती पैसे लागणार आहे.

मुंबईत प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; आता किती पैसे मोजावे लागणार?
toll naka Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 8:37 AM
Share

मुंबईत 1 ऑक्टोबरपासून प्रवास महागला आहे. मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील 5 टोलनाक्यांवरील नवे दर जाहीर करण्यात आले आहे.  मुंबईच्या वेशीवरील वाशी, एरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहीसर टोलनाक्यावरील  दरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाढ केली आहे. मिनी बस, एल. सी. व्ही. ट्रक, बस आणि अवजड वाहनांच्या दरात 15 ते 35 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे  काही वाहनधाराकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

नव्या निर्णयानुसार, मिनी बस, एल.सी.व्ही. वाहनांना 90 रुपये मोजावे लागणार आहे. ट्रक, बसला 180 रुपये मोजावे लागणार आहे. तर अवजड वाहनांनाना 225 रुपये टोल भरावा लागणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 55 उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. या उड्डाणपुलाचा खर्च वसूल करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर अशा टोलच्या नाक्याची उभारणी करण्यात आली आहे. ही वसुली 2027 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारने ऑक्टोबर 2024 पासून हलके वाहन, बेस्ट बस, एसटी आणि शालेय वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे. या निर्णयाने अनेकांना दिलासा मिळाला. परंतु मिनी बस, एल. सी. व्ही. वाहने, ट्रक, बस आणि अवजड वाहनांना पथकर लागू करण्यात आला आहे. तर तीन वर्षांनी टोल नाक्याच्या दरात एमएसआरडीसीकडून टोलची वाढ केली जात आहे.

टोलची दरवाढ ही 2023 साली झाली होती. त्यानंतर तीन वर्षांनंतर एमएसआरडीसीकडून पुन्हा टोलच्या दरात मोठी वाढ केली आहे. याविषयी बुधवारी सूचना प्रसिद्ध करण्यात आली. एमएसआरडीसीच्या जाहिरात सूचनेनुसार टोलच्या दरात 15 ते 35 रुरपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नवीन टोल दर आजपासून लागू होणार आहेत. नव्या नियमानुसार, वाहनधारकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. मिनी बस, एल. सी. व्ही. वाहनांना 75 रुपयांऐवजी 90 रुपये आकारले जाणार आहे. अवजड वाहनांना देखील अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.  ट्रक बस सारख्या वाहनांना 150 रुपयांहून थेट 180 रुपये मोजावे लागतील. तर अवजड 190 रुपयांऐवजी 225 रुपये इतके मोजावे लागतील.  नव्या दरांनुसार, एल.सी.व्ही वाहनाच्या दरात 15 रुपयांनी वाढ झाल्याचे समोर आलं आहे. तर ट्रक, बसच्या दरात 35 रुपयांनी वाढ झालीये. त्यामुळे मुंबईच्या एन्ट्री प्रवेशावरील प्रवास आजपासून महागणार आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...