ड्रेनेजमधील दोन कर्मचारी बाहेर न आल्याने तिसरा गेला, तिघांचाही मृत्यू

मुंबई: ड्रेनेज साफ करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना घडली. हे तीन कर्मचारी बुधवारी पनवेलमधील काळुंद्रे गावात ड्रेनेज साफ करण्यासाठी गेले होते. ड्रेनेजमध्ये उतरलेले दोन कामगार लवकर वर न आल्याने तिसरा कामगार त्यांना पाहण्यासाठी गेला, मात्र त्याचाही गुदमरून मृत्यू झाला. तीनही कर्मचारी मॅनहोलमधून वर न आल्याने गावकऱ्यांनी कळंबोली अग्निशमन विभागाला याबाबतची […]

ड्रेनेजमधील दोन कर्मचारी बाहेर न आल्याने तिसरा गेला, तिघांचाही मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई: ड्रेनेज साफ करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना घडली. हे तीन कर्मचारी बुधवारी पनवेलमधील काळुंद्रे गावात ड्रेनेज साफ करण्यासाठी गेले होते. ड्रेनेजमध्ये उतरलेले दोन कामगार लवकर वर न आल्याने तिसरा कामगार त्यांना पाहण्यासाठी गेला, मात्र त्याचाही गुदमरून मृत्यू झाला.

तीनही कर्मचारी मॅनहोलमधून वर न आल्याने गावकऱ्यांनी कळंबोली अग्निशमन विभागाला याबाबतची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीनही कामागारांना बाहेर काढलं असता, ते तिघेही मृतावस्थेत आढळले.

सिडकोचा कत्रांटदार विलास म्हसकर, कर्मचारी संतोष वाघमारे आणि आणखी एकाचा यामध्ये गुदमरुन मृत्यू झाला. हे तिघेही कामगार सिडकोचे होते.

तब्बल 40 ते 50 फूट खोल हे ड्रेनेज आहे. ड्रेनेजमध्ये तयार झालेल्या विषारी वायूनेच या कर्मचाऱ्यांचा बळी घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

डोंबिवलीनंतर आता पनवेलमध्ये एकाच वेळेस तीन कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याने, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दरम्यान  ठेकेदार साफसफाई कामगारांना योग्यरित्या सुरक्षा साहित्य पुरवत नसल्यानेही त्यांच्या जीवावर बेतत आहे.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.