कांदिवली आग: टॉयलेटमध्ये लपलेल्या तिघांचा मृत्यू

कांदिवली आग: टॉयलेटमध्ये लपलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई: कांदिवली पूर्वेकडील दामूनगर परिसरात काल गोडाऊनला लागलेली आग विझली आहे. मात्र या आगीची तीव्रता आज समोर आली आहे. कारण आग विझल्यानंतर आज चार मृतदेह आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे त्यापैकी तीन मृतदेह गोडावूनच्या टॉयलेटमध्ये आढळले. आगीपासून बचाव करण्यासाठी तीन जण टॉयलेटमध्ये लपले असावेत, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दामूनगर परिसरातील जीन्सच्या गोडाऊनला काल दुपारी चारच्या सुमारास […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई: कांदिवली पूर्वेकडील दामूनगर परिसरात काल गोडाऊनला लागलेली आग विझली आहे. मात्र या आगीची तीव्रता आज समोर आली आहे. कारण आग विझल्यानंतर आज चार मृतदेह आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे त्यापैकी तीन मृतदेह गोडावूनच्या टॉयलेटमध्ये आढळले. आगीपासून बचाव करण्यासाठी तीन जण टॉयलेटमध्ये लपले असावेत, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दामूनगर परिसरातील जीन्सच्या गोडाऊनला काल दुपारी चारच्या सुमारास आग लागली. ही आग विझल्यानंतर आज पहाटे तीनच्या सुमारास चार मृतदेह आढळले. त्यापैकी तीन टॉयलेटमध्ये तर एक गोडाऊनमध्येच आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर तीन जण आगीपासून वाचण्यासाठी टॉयलेटमध्ये लपले. तर एकाचा गोडाऊनमध्येच मृत्यू झाला.  हे चौघेही गोडाऊनमधील कर्मचारी होते. आगीनंतर ते गोडाऊनमध्येच अडकले होते.

मृतांमध्ये यांचा समावेश आहे. –

1.राजू राधेश्याम विश्वकर्मा-30

2.राजेश छोटेलाल विश्वकर्मा-36

3.भावेश वल्लभदास-51

4.सुदामा लल्लनसिंह-36

दरम्यान, चौघांचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन विभागाने गोदाम उद्ध्वस्त केलं. समता नगर पोलीस आता गोडाऊन मालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेत आहेत.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें