Chandrakant Patil : मिळकत करात 40 टक्के सवलत, मुख्यमंत्री शिंदे घेणार निर्णय, चंद्रकांत पाटलांनी नेमकं काय सांगितलं?

| Updated on: Sep 14, 2022 | 6:10 PM

वाढीव कराचा बोजा नागरिकांवर पडणार आहे. ही फरकाची रक्कम तातडीने भरण्याबाबतचे एसएमएसदेखील पालिका प्रशासनाने पाठविल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी ही बैठक घेतली.

Chandrakant Patil : मिळकत करात 40 टक्के सवलत, मुख्यमंत्री शिंदे घेणार निर्णय, चंद्रकांत पाटलांनी नेमकं काय सांगितलं?
चंद्रकांत पाटलांनी नेमकं काय सांगितलं?
Follow us on

पुणे : मिळकत करामध्ये (Income Tax) 40 टक्के सवलत देण्याबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत. या विषयाबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली जाणार आहे. तोपर्यंत महापालिकेने नागरिकांकडून कोणताही वाढीव मिळकत कर वसूल करू नये. अशा सूचना बुधवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत देण्यात आल्या. पुणे (Pune) महापालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये दिली जाणारी 40 टक्के सवलत पुन्हा लागू करावी. नागरिकांकडून घेतली जाणारी ही फरकाची रक्कम वसूल करू नये. अशी मागणी पुणेकर नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून (Social Organization) केली जात आहे. यावर चर्चा करून पुणेकरांना दिलासा देण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबई येथे बैठक घेतली.

बैठकीत यांची उपस्थिती

पुणे महापालिकेतील मिळकत कर विभागाचे अधिकारी, नगर विकास विभाग दोनचे अधिकारी उपस्थित होते. पालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अशी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती पाटील यांना केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. माजी सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगर विकास विभागाच्या उपसचिव छापवाले, मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख, विधी सल्लागार निशा चव्हाण व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

फरकाची रक्कम वसूल करण्याच्या सूचना

शहरातील मिळकत धारकांना दिली जाणारी 40 टक्के सवलत रद्द करण्यात येत आहे. पालिकेने यापुढील काळात ही सवलत देऊ नये, असे राज्य सरकारने यापूर्वीच पालिकेला कळविले आहे. त्यानुसार पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 40 टक्के सवलत रद्द केली आहे. तसेच गेल्या तीन वर्षापासून ही सवलत रद्द झाल्याने नागरिकांकडून फरकाची रक्कम वसूल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

तोडगा काढण्यासाठी होणार बैठक

वाढीव कराचा बोजा नागरिकांवर पडणार आहे. ही फरकाची रक्कम तातडीने भरण्याबाबतचे एसएमएसदेखील पालिका प्रशासनाने पाठविल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी ही बैठक घेतली. यामध्ये सर्व अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.