AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाकाळात आर्थर रोड कारागृहातून पॅरोलवर सोडलेले 451 कैदी फरार

कोरोनाकाळात मुंबई उच्च न्यायालयाच्या पॅनेलच्या शिफारसीनूसार कोविड साथीचा संसर्ग टाळण्यासाठी पॅरोलवर सोडलेल्या 14 हजार कैद्यांपैकी 451 कैदी फरार झाल्याची खळबळजनक वृत्त टाईम्सने दिले आहे.

कोरोनाकाळात आर्थर रोड कारागृहातून पॅरोलवर सोडलेले 451 कैदी फरार
arthurroadImage Credit source: socialmedia
| Updated on: Jan 24, 2023 | 12:08 PM
Share

मुंबई : कोरोनाकाळात साथीचा प्रभाव वाढल्याने मुंबईच्या आर्थर रोड ( Arthur Road ) कारागृहातून पॅरोलवर ( parole ) सोडलेले 451 कैदी फरार झाले असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या कैद्यांना शोधण्याची अवघड जबाबदारी मुंबई पोलीसांवर पडली आहे. या काही कच्च्या कैद्यांचा तर काही दोषी ठरलेल्या कैद्यांचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या कैद्यांना शोधून त्यांना परत आणण्यासाठी पोलीसांनी भादंवि कलम 357 अंतर्गत कारवाई करण्याची मोहिम सुरू केली आहे.

साल 2021 मध्ये कोरोनाची साथ पसरल्याने देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. 27 मार्च पासून देशभरात कोविडची टाळेबंदीची घोषणा झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. या काळात मुंबईतील सर्वात मोठ्या आर्थर रोड कारागृहात अत्यंत दाटीवाटीने असलेल्या कैद्यांना संसर्गाच्या भीतीने पॅरोलवर सोडले होते. त्यातील 451 कैदी पॅरोलची रजा संपल्यानंतर हजर झालेच नाहीत. त्यामुळे तुरूंगप्रशासनात खळबळ माजली आहे. या कैद्यांना शोधायचे कसे हा गहन प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

कोरोनाकाळात कोविड-19 साथीचा वाढता प्रकोप पाहून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने मानवीय भूमिकेतून आर्थर रोड कारागृहाच्या तब्बल 14 हजार कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडले होते. त्यात काही आरोपपत्र दाखल न झालेले ( undertrials)  कच्चे कैदी होते. तर काही गुन्ह्यात आरोपपत्र दाखल होऊन खटला उभारून न्यायालयाने दोषी ठरविलेले आरोपीही होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या पॅनेलने या कैद्यांना कोविड साथीचा संसर्ग टाळण्यासाठी तुरूंगातील संख्या कमी करण्यासाठी पॅरोलवर सोडावे अशी शिफारस केली होती. त्यानंतर चार हजार दोषी आरोपींसह एकूण 14 हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातील चार हजार दोषी ठरलेल्या कैद्यांनी त्यांचा पॅरोल संपताच पुन्हा आपल्या बराकीत परतणे अपेक्षित असताना ते त्यांच्या बराकीत परतलेच नसल्याचे उघडकीस आले आहे. या फरार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी आता भादंवि कलम 357 अंतर्गत कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.

Follow Us
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...