
आज मुंबईतील दादर परिसरात तेजस्विनी बसचा खूप मोठा अपघात झाला आहे. ही बस मरोळ आगाराची असल्याची माहिती आहे.

मरोळ आगाराच्या क्र. 22 नंबर बसची अपघातानंतरची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचं दिसलं आहे. सुदैवानं या अपघातात जिवितहानी झालेली नाही.

मात्र प्राथमिक माहितीनुसार बस वाहक- बस चालक तसेच 7-8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रवाशांवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सूरु आहेत.

बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री सुहास सामंत, नगरसेवक आणि बेस्ट समिती सदस्य श्री अनिल कोकीळ, नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्ष श्री रामदास कांबळे 4 वाजता सायन हॉस्पिटलमध्ये जखमी प्रवाशांची भेट घेणार आहेत.

ट्रक आणि बसची भयानक धडक झाल्यानं हा अपघात झाला आहे.