AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चर्चगेट-बोरिवली लोकलमधून प्रवाशाला फेकले, वांद्रे खाडीवर लोकल आली असताना, घडली घटना

चर्चगेट-बोरिवली लोकलमधून एका व्यक्तीला फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणात वांद्रे येथील खाडीत हा तरुण पडला असून त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

चर्चगेट-बोरिवली लोकलमधून प्रवाशाला फेकले, वांद्रे खाडीवर लोकल आली असताना, घडली घटना
western railway
| Updated on: Aug 20, 2026 | 8:20 PM
Share

चर्चगेट ते बोरीवली धावणाऱ्या लोकलमधून एका प्रवाशाला किरकोळ वादातून लोकलमधून फेकून दिल्याची घटना घडली आहे. वांद्रे खाडीजवळ ही घटना घडली असून जखमी प्रवाशाला वांद्रे पश्चिमेकडील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी देखील लोकल मधून प्रवाशांना फेकून देण्याच्या घटना पश्चिम रेल्वेवर घडलेल्या आहेत.

अपंगाच्या डब्यात झाली मारामारी

चर्चगेट ते बोरीवली धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अंपगाच्या डब्यात झालेल्या वादातून एका प्रवाशाला लोकलमधून खाली ढकलल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 1:24 वाजता चर्चगेट ते बोरीवली धीमी लोकल वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली असताना प्रवाशांनी पोलिसांना सांगितले की एका मंदबुद्धी व्यक्तीने चालत्या ट्रेनमधून एका प्रवाशाला वांद्रे ते माहिम दरम्यान खाली ढकलले.

माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी वांद्रे आणि माहिम दरम्यान बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला पोलिसांनी शोधून त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात 48 वर्षीय आरोपी अमजद सफरुद्दीन शेख याला ताब्यात घेतले आहे. आरोपीने सांगितले की डब्यात कावळा आल्याने त्याला हाकलताना हा धक्का लागल्याचा दावा केला आहे.

जयबाला आशर प्रकरणाची आठवण

पश्चिम रेल्वेवर यापूर्वी डब्यातील गर्दी आणि वादातून प्रवाशांना लोकलमधून फेकण्याच्या घटना घडलेल्या आहेत. ९० च्या दशकात तर जयबाला आशर या तरुणीला गर्दुल्ल्याने लोकलच्या डब्यात फेकल्याने आणि नेमकी लोकल त्यावेळी आल्याने तिच्या पायांवरुन लोकल गेल्याने ही घटना प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर जयबाला आशर हीला पश्चिम रेल्वेने नोकरीत ठेवले होते.  मध्य रेल्वेवर डोंबिवलीतील एक तरुण भावेश निकटे लोकलच्या दरवाज्याला लटकत प्रवास करत असताना खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला होता.

Follow Us
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?