AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिली बायको असताना केले दुसरं लग्न, तिला घेऊन घरी आला अन्… विरारमध्ये भयंकर कांड

विरारमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीचा काटा काढण्यासाठी असे काही केले की पोलिसांना मध्ये पडावे लागले.

पहिली बायको असताना केले दुसरं लग्न, तिला घेऊन घरी आला अन्... विरारमध्ये भयंकर कांड
सांकेतिक फोटोImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 9:57 AM
Share

विरार येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पुरुषाने पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर अचानक दुसरे लग्न केले. दुसरे लग्न केल्यानंतर त्याने दुसऱ्या बायकोला घरी आणले. तिलापाहून पहिल्या बायकोने असे काही केले की थेट पोलिसांना बोलवावे लागले. आता हे प्रकरण नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया…

विरार पश्चिमच्या बोलिंज पोलीस स्टेशन क्षेत्रात ही घटना घडली. पतीच्या दुसऱ्या पत्नीवर पहिल्या पत्नीने चाकू आणि त्रिशूळाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात २२ वर्षीय कोमल अनिल सरोज जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी पहिली पत्नी लक्ष्मीला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला ही आरोपी महिलेची सवत आहे. पतीने दुसरे लग्न केल्यामुळे नाराज झालेल्या पहिल्या पत्नीने कोमलला जिवे मारण्याच्या हेतूने हल्ला केला. माहितीनुसार, कोमल अनिल सरोज, वय २२ वर्षे, मेफेयर गार्डन बिल्डिंग, विरार पश्चिम येथे राहतात. कोमलने नालासोपारा पश्चिम येथे राहणाऱ्या राजकुमार प्रसाद, वय ३१ वर्षे, यांच्याशी लग्न केले होते. राजकुमार प्रसाद आपल्या पहिल्या पत्नी लक्ष्मीपासून काही कारणाने वेगळे झाले होते. त्यानंतर त्यांनी कोमलशी लग्न केले. या लग्नामुळे राजकुमारची पहिली पत्नी लक्ष्मी नाराज होती.

नवऱ्याला व्हिडीओ कॉल करुन दाखवली दृश्ये

दुपारी लक्ष्मी कोमलच्या घरी पोहोचली आणि तिच्याशी भांडायला लागली. याच दरम्यान लक्ष्मीने आपल्याजवळ असलेल्या चाकूने कोमलच्या हातावर वार केला. यानंतर प्रकरण आणखी गंभीर झाले. लक्ष्मीने कोमलला खोलीत बंद करून तिच्या डोक्यावर आणि पाठीवर चाकू व त्रिशूळाने हल्ला केला. तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर कोमलवर पेट्रोल ओतून आग लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

हल्ल्यादरम्यान लक्ष्मीने आपल्या पती राजकुमारला व्हिडिओ कॉल करून संपूर्ण दृश्य दाखवत कोमलला जिवे मारण्याची धमकी दिली. घटना समजल्यानंतर राजकुमार घरी पोहोचले आणि जखमी कोमलला उपचारासाठी रुग्णालयात नेले.त्यानंतर क्षेत्रीय पोलीस बोलिंजला घटनेची माहिती देण्यात आली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि हल्ला करणाऱ्या पहिल्या पत्नी लक्ष्मीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध बीएनएसच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.

Follow Us
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?